घरदेश-विदेश'मोदी, गहलोत, वसुंधरा यांना पेटीपॅक करुन पाठवून देईल'

‘मोदी, गहलोत, वसुंधरा यांना पेटीपॅक करुन पाठवून देईल’

Subscribe

बहुजन समाज पार्टीचे नेते जगत सिंह यांनी मोदी, गहलोत, वसुंधरा यांना पेटीपॅक करुन पाठवून देईल, असे विधान केले आहे. त्यांनी सध्या राजस्थानच्या रामगढ येथील विधानसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज भरला आहे. त्यामुळे प्रचारसभेत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचा मुलगा आणि बहुजन समाज पार्टीचे नेते जगत सिंह यांचा भाषणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या भाषणामध्ये त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका केली जात आहे. या व्हिडिओमध्ये जगत सिंह एका सभेमध्ये बोलताना दिसत आहे. या सभेमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मला दगडाचं उत्तर एके-47 ने देता येतं. मोदी, गेहलोत आणि राजे यांनी यावं. सगळ्यांना पेटीपॅक करुन पाठवून देईल, असे सिंह म्हणाले आहेत. जगत सिंह यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाच्या तोंडू फुटू शकतो.

काय आहे नेमकं प्रकरण?

राजस्थानच्या रामगढ येथे विधानसभेचे उमेदवार लक्ष्मण सिंह यांच्या निधनामुळे निवडणुकीला स्थगिती दिली गेली होती. या जागेसाठी येत्या २८ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यानंतर ३१ जानेवारीला मतमोजनी होणार आहे. जगत सिंह यांनी या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज भरला आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभेत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले की, ‘मी मागे हटणार नाही. गोळी झाडली गेली, तरी चालेल. पण मी मागे हटणार नाही. गोळी झाडली गेली तर सर्वप्रथम ती गोळी मी माझ्या छातीवर झेलेन. दगडाचं प्रत्युत्तर मी एके-47 ने देईल. त्यामुळे मोदी, गहलोत, वसुंधरा यांना पेटीपॅक करुन पाठवून देईल’.

- Advertisement -


हेही वाचा –  पंतप्रधान मोदी बनले ‘सुपरस्टार’…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -