B.Tech केलेली मुलगी टॅक्सी ड्रायव्हर ; संघर्ष कथा ऐकून तुम्हीही कराल तिच्या धाडसाचं कौतुक

तिने व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि एक अल्टो खरेदी केली आणि 2021 पासून Uber साठी गाडी चालवायला सुरुवात केली. ती आता या व्यवसायात खूप खूश आहे.

BTech girl drives Uber You will also appreciate her courage after hearing the story of struggle
BTech girl drives Uber You will also appreciate her courage after hearing the story of struggle

मागच्या एका दशकात महिलांनी खूप काही साध्य केले आहे. एक काळ असा होता की, महिलांना मतदानाच्या हक्कासाठी लढावे लागले. परंतु, इतिहासातील शूर महिलांनी केलेल्या अविरत संघर्ष आणि लढ्यांमुळे आता आपण आपल्या पुरुष समकक्षांच्या बरोबरीने काम करत आहोत.( BTech girl drives Uber You will also appreciate her courage after hearing the story of struggle )

समाजात समानतेच्या योग्य भावनेसाठी काही समज दूर करण्याची गरज आहे आणि हे समज दूर करण्याचं काम धाडसी महिला करत आहेत. अशीच एक घटना सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. कोलकात्याच्या दिप्ती घोष या महिला उबेर ड्रायव्हरची ही प्रेरणादायी कथा आहे. परम कल्याण सिंह नावाच्या फेसबुक युजरने एक पोस्ट शेअर करत त्यांचा अनुभव सांगितला आहे.

परमने लिहिले की, काल मी लेक माॅलला जाण्यासाठी क‌‌ॅब बुक केली. मला एका लेड ड्रायव्हरचा फोन आला. मला आश्चर्य वाटलं की त्या बाईने ना पेमेंट ना मोड विटारले ना ड्रा‌‌ॅप विचारलं, तिने अगदी शांतपणे पिकअप लोकेशन विचारलं. त्यानंतर क‌ॅबमध्ये बसताना ड्रायव्हरची बोलण्याची पद्धत एखाद्या सुशिक्षित बाईसारखी होती, म्हणून मी तिला तिची शैक्षणिक पार्श्वभूमीवर विचारली. तिने जे सांगितले ते जाणून आश्चर्य वाटेल. दिप्ती ही बीटेक पदवीधर इलेक्ट्रिकल इंजिनिअर होती.

दिप्ती ही इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक पदवीधर आहे. तीने वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये 6 वर्षे काम केले. त्यानंतर तिच्या वडिलांचा 2020 मध्ये मृत्यू झाला. तिच्या मागे तिची आई आणि एक लहान बहीण आहे. त्यानंतर नोकरी करायची म्हणजे दिप्तीला नोकरी करण्यासाठी कोलकाता बाहेर जावे लागणार होते. ती जर शहराच्या बाहेर गेली तर तिच्या मागे तिची बहिण आणि आई यांचं काय होईल, या विचाराने तिने व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि एक अल्टो खरेदी केली आणि 2021 पासून Uber साठी गाडी चालवायला सुरुवात केली. ती आता या व्यवसायात खूप खूश आहे. सिंग यांनी कॅप्शनमध्ये जोडले की, ती आठवड्यातून 6 दिवस दिवसाचे 6-7 तास ड्रायव्हिंग करून दरमहा ती सुमारे 40 हजार कमवते.

( हेही वाचा: मी अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही, जयंत पाटील भावनिक… प्रफुल्ल पटेलांचं मोठं विधान )

या पोस्टला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. लोकांनी दीप्ताचे कौतुक केले आणि तिच्या संघर्षाचे आणि धैर्याचे कौतुक केले आहे.