घरदेश-विदेशBudget 2019 : भारत सरकार गरिबांसाठी कोट्यवधी घरे बांधणार

Budget 2019 : भारत सरकार गरिबांसाठी कोट्यवधी घरे बांधणार

Subscribe

भारत सरकार गरिबांसाठी १.९४ कोटी घरे बांधणार असल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात केली आहे. याशिवाय सरकार फक्त १४० दिवसांमध्ये गरिबांना घरे बांधून देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी लोकसभेत सादर झाला. हा अर्थसंकल्प देशाच्या पहिल्या महिला केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला. यावेळी सीतारमण यांनी गरिबांसाठी १.९५ कोटी घरे बांधून देणार असल्याची घोषणा केली आहे. ‘प्रत्येकाचे हक्काचे घर व्हावे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. गरिबांना घरे बांधून देण्याकडे भारत सरकार गंभीरतेने करत आहे. पूर्वी घरे बांधण्यासाठी ३४० दिवस लागायचे. मात्र, आता फक्त १४० दिवसांमध्ये घरे बांधली जामार आहेत’, असे निर्मला सीतारमण म्हणाल्या.

सर्व घरांमध्ये शौचालयाची व्यवस्था असणार

निर्मला सीतारमण यांनी सांगितल्यानुसार ११४ दिवसांमध्ये गरिबांसाठी १.९५ कोटी घरे बांधली जाणार आहेत. या घरांचे काम २०२२ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वान त्यांनी दिले आहे. सर्व ग्रामीण भागांमध्ये घरे बनवली जाणार असल्याचे सीतारमण म्हणाल्या.

- Advertisement -

भाड्याच्या घरात राहणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण कायदा

या अर्थसंकल्पात भाड्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांचा देखील विचार केला गेला. भाड्याच्या खोलीत राहणाऱ्यांसाठी केंद्र सरकार लवकरच एक महत्त्वाचा कायदा आणणार असल्याचे निर्मला सीतारमण म्हणाल्या आहेत. या कायद्यान्वे घरमालक कोणत्याही प्रकारची मनमानी न करुन घर भाडे वाढवू शकणार नाही. याशिवाय या कायद्यामध्ये घर मालकाचाही विचार केला जाणार असल्याचे सीतारमण यांनी सांगितले.


हेही वाचा – Budget 2019-2020 Live: स्वस्त घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर

- Advertisement -

हेही वाचा – Budget 2019: इंदिरा गांधींनंतर सीतारामन यांनी केला अर्थसंकल्प सादर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -