घरताज्या घडामोडीकरदात्यांसाठी अर्थमंत्र्यांचा धमाका, ५ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त!

करदात्यांसाठी अर्थमंत्र्यांचा धमाका, ५ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त!

Subscribe

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा २०२०-२१ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सगळ्यात जास्त लक्ष होतं ते देशातल्या करदात्यांसाठी अर्थमंत्री काय घोषणा करणार याकडे! देशभरातल्या करदात्यांसाठी अर्थमंत्र्यांनी दिलासा दिलेला आहे. यामध्ये आत्तापर्यंत करदात्यांना २ लाख ५० हजार रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं होतं. त्यात वाढ करून आता ५ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे आता वार्षिक उत्पन्नाच्या ५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. कर प्रणाली अधिक सुकर आणि दिलासादायक करण्याचं धोरण असल्याचं यावेळी निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलं.

यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशभरातल्या वैयक्तिक करदात्यांसाठी कररचनेच्या सर्व स्लॅब्सची घोषणा केली. त्यानुसार…

- Advertisement -

० ते २.५ लाखांपर्यंतचं उत्पन्न – कोणताही कर नाही

नव्या घोषणेनुसार – ५ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न – कोणताही कर नाही

- Advertisement -

५ लाख ते ७.५ लाख – सध्याच्या २० टक्क्यांवरून १० टक्के कर

७.५ लाख ते १० लाख – सध्याच्या २० टक्क्यांवरून १० टक्के कर

१० लाख ते १२.५ लाख – सध्याच्या ३० टक्क्यांवरून २० टक्के कर

१२.५ लाख ते १५ लाख – सध्याच्या ३० टक्क्यांवरून २५ टक्के कर

१५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न – ३० टक्के (यात कोणताही बदल नाही)


BUDGET 2020 – वाचा काय आहे यंदाच्या अर्थसंकल्पात?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -