Union Budget 2021 LIVE : येत्या आर्थिक वर्षात ४.३९ लाख कोटी खर्च करणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

budget 2021 live news updates in marathi fm nirmala sitharaman
सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात येणार
सोलर उत्पादनांवरील कस्टम ड्युटी वाढवली जाण्याची शक्यता, भारतातील सोलर उपकरणांमध्ये वाढ व्हावी म्हणून आयात होणाऱ्या उपकरणांवरील कस्टम ड्युटी वाढवण्यात येणार

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजारात उसळी, १२५० अंकांनी वधारला

परवडणारे घर खरेदी करण्यासाठी कर्जामध्ये १.४५ लाखापर्यंतची सवलत मिळणार

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने जनगणना होणार, ३७०० कोटी रूपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

भारतीय भाषांसाठी नॅशनल लॅंग्वेज ट्रान्सलेशन मिशन


जेष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्पातील विशेष तरतूद, ज्यांचे वय ७५ वर्षे अधिक आहे त्यांना  इनकम टॅक्स रिटर्न्स फाईल करण्यासापासून सूट

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं लक्ष्य तर गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींच्या मदतीची तरतूद


देशात नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थची उभारणी करणार असून त्यासोबतच ९ बायोलॅब उभारणीसाठीही तरतूद करण्यात आली आहे.


सरकारी बँकांसाठी २० हजार कोटींची तरतूद, बीपीसीएल, एअर इंडिया, पवन हंस, आयडीबीआयची निर्गुंतवणूकीची प्रक्रिया पूर्ण करणार – अर्थमंत्री


आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन योजनांची खैरात

विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांसाठी मोठी घोषणा..केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसामाकरता योजना – अर्थमंत्री


देशभरात ७ टेक्स्टटाईल पार्क उभारणार – अर्थमंत्री


येत्या आर्थिक वर्षात ४.३९ लाख कोटी खर्च करणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा


नाशिक मेट्रोसाठी २ हजार ९२ हजार तर नागपूर मेट्रोसाठी ५ हजार ९७६ कोटींची तरतूद – अर्थमंत्री


सार्वजनिक वाहतुकीतील बसेसची सुधारणा करण्यासाठी १८ हजार कोटी – अर्थमंत्री


कचऱ्याची विल्हेवाट लावण्य़ासाठी १ लाख ७८ हजार कोटींची निधी – अर्थमंत्री


मुंबई- कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटींची तरतूद – अर्थमंत्री


अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात सोलार एनर्जी कॉर्पोरेशनला १ हजार कोटींची तरतूद – अर्थमंत्री


राष्ट्रीय रेल्वे योजना २०३० ची अर्थमंत्र्यांकडून घोषणा

पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात मोठी भांडवली तरतूद, २०३० पर्यंत हायटेक रेल्वेचं लक्ष्य डोळ्यासमोर, रेल्वेसाठी १ लाख १० हजार ५५ कोटींच्या निधीची तरतूद – अर्थमंत्री


उज्वला योजनेत १ कोटी लोकांना सहभागी करून घेणार, १०० जिल्ह्यांमध्ये सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन योजना राबवणार

दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरात गॅस पाईपलाईनचा विस्तार करणार – अर्थमंत्री


१५ वर्षे जुन्या वाहनांसाठी ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’

जुन्या वाहनांचा फिटनेस तपासला जाणार असून जुनी वाहने मोडीत निघणार. -अर्थमंत्री


मिशन पोषण २.० ची अर्थमंत्र्यांकडून घोषणा -अर्थमंत्री


अर्बन स्वच्छ भारत मिशन २.०  साठी १ लाख ४१ हजार ६७८ कोटी २०२१

जल जीवन मिशन योजनेसाठी २ लाख ८७ हजारांची तरतूद, अनेक शहरांसाठी जलजीवन मिशन राबवणार – अर्थमंत्री


अर्थसंकल्पात कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद


पीएम आत्मनिर्भर स्वास्थ भारत योजना, स्वास्थ भारतासाठी ६४ हजार १८० कोटींची घोषणा – अर्थमंत्री


देशात नव्या आरोग्य संस्था उभारणार तसेच आरोग्य संस्थांना बळकटी प्राप्त होण्यासाठी प्रयत्न – अर्थमंत्री


अर्थसंकल्पात आत्मनिर्भर भारताचं व्हिजन असणार असून आत्मनिर्भर भारतात तरूणांना संधी देण्यात येणार -अर्थमंत्री


शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असून शेती क्षेत्र मजबूत करण्यावर अधिक भर – अर्थमंत्री


कोरोनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचा पूरवठा केला- अर्थमंत्री


आत्मनिर्भर भारताच्या पॅकेजमध्ये सुधारणा करण्यात आली असून १०० पेक्षा अधिक देशांना कोरोनाची लस देणार -अर्थमंत्री


८० कोटी लोकांना मोफत धान्य पुरवलं यासह ८ कोटी लोकांना मोफत गॅस कनेक्शन देखील देण्यात आले- अर्थमंत्री


निर्मला सीतारमण म्हणाल्या की, मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेज म्हणून कोरोना काळात अनेक योजना देशात आणल्यात जेणेकरून अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होईल. आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये एकूण २७.१ लाख कोटी रुपये जाहीर झाले. हे सर्व पाच मिनी बजेटसारखेच होते.


कॉंग्रेसचे खासदाराचा अर्थसंकल्पास विरोध

कॉंग्रेसचे खासदार गुरजित औजला काळे कपडे घालून संसदेत दाखल झाले आहेत. कॉंग्रेसनेही अध्यक्षांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला, यानंतर शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावरून कॉंग्रेस खासदार यांच्या वतीने निषेध नोंदविला जात आहे.


कॅबिनेच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मिळाली मंजूरी. थोड्याच वेळात अर्थमंत्री सादर करणार यंदाचा अर्थसंकल्प


मोदी कॅबिनेच्या बैठकीस सुरूवात झाली असून या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजूरी मिळणार


अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसद भवनात दाखल. थोड्याच वेळात मोदी कॅबिनेच्या बैठकीस होणार सुरूवात


२०२१ चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट केलं आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्रावर मोदी सरकार काम करत असून, भारताला नवी दिशा देण्याचे काम करत आहे. मला खात्री आहे की, यंदाचा अर्थसंकल्प सर्वांची इच्छापूर्ती करणारा असणार आहे,” असे अनुराह ठाकूर म्हणाले.


अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेट सादरीकरणासाठी संसदेत पोहचल्या


टॅबचा वापर करून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यंदाचा अर्थसंकल्प मांडणार


Union Budget आधीच बाजारात जोरदार उसळी, ४०६ पॉईंट्सच्या वृद्धीने सेंसेक्स खुलला  

https://twitter.com/ANI/status/1356086865619652608

निर्मला सीतारमण अर्थ मंत्रालयात दाखल


अर्थसंकल्पाचे वेळापत्रक

  • ८.३० – अर्थ मंत्री निर्मला सीतारमण घर सोडतील
  • ९.०० – सीतारमण राष्ट्रपती भवनासाठी रवाना
  • १०.०० – संसद भवनात प्रवेश करणार
  • १०.१५ – अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची संसदेत बैठक.
  • ११.०० – अर्थसंकल्प सादर करणार.
  • ३.०० – अर्थ मंत्री निर्मला सीतारमण राज्यमंत्री आणि इतर सर्व सचिवांसमवेत अर्थसंकल्पानंतर परिषदेत बोलतील.
  • ४.४५ – नवी दिल्ली येथे सर्वसाधारण अर्थसंकल्प २०२१ मधील भारतीय रेल्वेच्या तरतुदींविषयी पत्रकार परिषद होणार.

कोरोना संसर्गामुळे सुमारे सात महिने देशात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे उद्योगधंदे, व्यापार खंडित झाला होता. या पार्श्वभूमीवर देशाचा अर्थसंकल्प सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास संसदेत मांडण्यात येणार आहे. प्रथमच कागदविरहित, डिजिटल स्वरुपातील या अर्थसंकल्पात नेमके काय असेल याची उत्सुकता प्रत्येक देशवासीयाला लागली आहे. कोरोना काळातील झालेला तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकार नवीन कर लावणार की, उद्योगधंद्यांना, शेतीला चालना देण्यासाठी काही उपाययोजना करणार हे आता काही तासांतच उघड होणार आहे.