घरअर्थजगत२९ जानेवारीपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; १ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प

२९ जानेवारीपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; १ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प

Subscribe

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. दोन टप्प्यांत हे अधिवेशन होणार आहे. ८ एप्रिलपर्यंत हे अधिवेशन असणार आहे. दरम्यान, १ फेब्रुवारीला संसद सर्वसाधारण अर्थसंकल्प (आर्थिक वर्ष २०२१-२२) संसदेत सादर करण्यात येईल.

लोकसभा सचिवालयानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा २९ जानेवारीपासून सुरू होणार असून १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. तर दुसरा टप्पा ८ मार्च ते ८ एप्रिल या काळात चालणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला जाईल. संसदीय कामांच्या मंत्रिमंडळाच्या समितीने (CCPA) २9 जानेवारीपासून कॅबिनेट सत्राची शिफारस केली होती. सत्रादरम्यान कोरोना विषाणूशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे अनुसरण केले जाणार आहे.

- Advertisement -

हिवाळी अधिवेशन केलं होतं रद्द

कोरोनामुळे यावेळी संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आलं होतं. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे संसदेचं हिवाळी अधिवेशन यावेळी होणार नसल्याचं सरकारने म्हटलं होतं. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली. कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, संसदेचे अधिवेशन बोलवावे जेणेकरून शेतकऱ्यांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होऊ शकेल. यानंतर मोदी सरकारमधील संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेतील कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना एक पत्र लिहिलं. सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर एकमत झालं की कोरोनामुळे अधिवेशन बोलावलं जाऊ नये, असं ठरल्याचं प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -