Budget 2022 memes : अर्थसंकल्प झाला सादर अन् जनता बोलते, क्या करु मै मर जाऊं…

आज मंगळवारी 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 2022 -23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांपासून बड्या व्यक्तींपर्यंत सर्वांनाच काहीतरी देण्याचा दावा केंद्र सरकारने केला होता. दरम्यान, सर्वसामान्य नागरिक या अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकरात होणाऱ्या बदलांची वाट पाहत होते मात्र जनतेच्या पदरी फक्त निराशाच पडली आहे.

Budget 2022 memes: Rain of memes on social media as soon as the budget is presented
Budget 2022 memes : अर्थसंकल्प झाला सादर अन् जनता बोलते, क्या करु मै मर जाऊं...

आज मंगळवारी 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 2022 -23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांपासून बड्या व्यक्तींपर्यंत सर्वांनाच काहीतरी देण्याचा दावा केंद्र सरकारने केला होता. दरम्यान, सर्वसामान्य नागरिक या अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकरात होणाऱ्या बदलांची वाट पाहत होते मात्र जनतेच्या पदरी फक्त निराशाच पडली आहे. यावर्षी देखील टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना असणाऱ्या आशांच्या निराशा झाल्या आहेत. असं काही घडलं आणि सोशल मिडिया शांत कसा काय राहिल? हे अर्थसंकल्प सादर होताच, सोशल मिडियावर मीम्सचा धुमाकुळ सुरु आहे. सर्वसामान्यांच्या या अर्थसंकल्पात झालेल्या अपेक्षाभंगावर सोशल मिडियावर मीम्सचा जोरदार पाऊस पडला आहे.

टॅक्समध्ये सूट न मिळाल्यामुळे सर्वसामान्य आणि नोकरदार वर्गाची हालत काहीशी अशी झाली आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सर्वसामान्यांचा नेहमीच हिरमोड होतो. अशा आशयाच्या कमेंट करत सोशल मिडियावर मीम्स व्हायरल होत आहेत. मीम्स तयार करण्यासाठी अनेक सिनेमा, सिरियल, वेबसीरीज आणि काही टिव्ही शोमधील डायलॉगचा वापर करण्यात आला आहे.

याशिवाय क्रिप्टोकरन्सीवर केंद्र सरकार काय निर्णय देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या अर्थसंकल्पात सरकारने क्रिप्टोकरन्सीवरील उत्पन्नावर 30 टक्के कर लावण्याची घोषणा केली असून,क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार करणाऱ्यांना याचा फार मोठा झटका बसला आहे.


हे ही वाचा – कर चुकवेगिरी करणाऱ्यांचा व्हाईटवॉश, अर्थसंकल्पात नवीन नियमाची घोषणा