घरBudget 2024Budget 2024 : महिला, तरुण आणि गरिबांच्या उन्नतीचं उद्दीष्ट; अर्थमंत्री सीतारामनकडून बजेट...

Budget 2024 : महिला, तरुण आणि गरिबांच्या उन्नतीचं उद्दीष्ट; अर्थमंत्री सीतारामनकडून बजेट मांडणं सुरू

Subscribe

अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प आहे. यावेळी अर्थमंत्री सहावा अर्थसंकल्प सभागृहात मांडत आहेत. मोरारजी देसाईंनंतर सीतारामन या दुसऱ्या अर्थमंत्री आहेत, ज्यांना सहा वेळा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली.

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर अर्थमंत्री सीतारामण यांच्याकडून अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यास सुरू झाली आहे. अर्थसंकल्पाच्या अभिभाषणात संबोधित करताना अर्थमंत्री सीतारामण यांनी देशातील महिला, तरुण आणि गरिबांच्या उन्नतीचीचं आमचं उद्दीष्ट असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. (Budget 2024 Aims for upliftment of women youth and poor Budget presentation by Finance Minister Sitharaman)

अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प आहे. यावेळी अर्थमंत्री सहावा अर्थसंकल्प सभागृहात मांडत आहेत. मोरारजी देसाईंनंतर सीतारामन या दुसऱ्या अर्थमंत्री आहेत, ज्यांना सहा वेळा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली.

- Advertisement -

हेही वाचा : Sanjay Raut : देशाला अश्मयुगाकडे घेऊन जाण्याचा भाजपचा डाव; संजय राऊतांचा हल्लाबोल

अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या की, मागील दहा वर्षांत आम्ही सर्वांसाठी घरे, प्रत्येक घराला पाणी, सर्वांसाठी बँक खाती अशी कामे विक्रमी वेळेत पूर्ण केली. 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली. संसाधनांचे वितरण पारदर्शकतेने करण्यात आले आहे. सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानांच्या मते गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार जातींवर आमचे लक्ष आहे. त्यांच्या गरजा, त्यांच्या आकांक्षा आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Chandigarh Mayor Polls : 2024च्या निवडणुका कशा होतील याचे प्रात्यक्षिक, ठाकरे गटाचा हल्लाबोल

देशाला नवा उद्देश आणि नवी आशा मिळाली. जनतेने पुन्हा बहुमताने सरकारला निवडून दिले. आम्ही दुहेरी आव्हाने स्वीकारली आणि सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या मंत्राने काम केले. आम्ही सामाजिक आणि भौगोलिक समावेशासह काम केले. ‘सबका प्रयत्न’ या मंत्राने आपण कोरोना काळाचा सामना केला आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी काळात प्रवेश केला. परिणामी आपल्या तरुण देशाला आता मोठ्या आकांक्षा आणि अपेक्षा आहेत. असेही यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.

गरिबांचे कल्याण म्हणजे देशाचे कल्याण

गरिबांचे कल्याण, देशाचे कल्याण, हा मंत्र घेऊन आम्ही काम करत आहोत. सबका साथ या उद्देशाने आम्ही 25 कोटी लोकांना विविध प्रकारच्या गरिबीतून बाहेर काढले आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्यासाठी आम्ही काम करत आहोत असेही यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावेळी म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -