घरBudget 2024Budget 2024: आशा, अंगणवाडी सेविकांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा; आयुष्मान भारत योजनेत होणार...

Budget 2024: आशा, अंगणवाडी सेविकांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा; आयुष्मान भारत योजनेत होणार समावेश

Subscribe

आशा, अंगणवाडी सेविकांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे. या सेविकांचा आयुष्मान भारत योजनेत समावेश करण्याचं प्रस्तावित असल्याचं त्या म्हणाल्या.

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प (अर्थसंकल्प 2024) सादर केला. या अर्थसंकल्पात करदात्यांना कोणतीही नवीन सूट देण्यात आलेली नाही. म्हणजेच आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर बजेटमध्ये महिलांच्या उन्नतीचं उद्धिष्ट असल्याचं, त्या म्हणाल्या. तर आशा, अंगणवाडी सेविकांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे. या सेविकांचा आयुष्मान भारत योजनेत समावेश करण्याचं प्रस्तावित असल्याचं त्या म्हणाल्या. (Budget 2024 Asha big announcement in budget for Anganwadi sevika To be included in Ayushman Bharat Yojana)

आशा सेविका,अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आणण्याचेही निर्मला सीतारामन यांनी प्रस्तावित केले आहे.

- Advertisement -

विविध विभागाअंतर्गत असलेल्या सध्याच्या रुग्णालय पायाभूत सुविधांचा उपयोग करत नवी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार सध्याच्या रुग्णालय पायाभूत सुविधा तपासत वैद्यकीय महाविद्यालयांसाठी शिफारस करण्याकरिता समिती स्थापन करण्यात येणार आशा सेविका,अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना आरोग्य कवच युवा शक्तीवर लक्ष केंद्रित करत आणि 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याचे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने वाटचाल करतानाच आणखी वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्याची घोषणा केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 या वर्षासाठी संसदेत अंतरिम अर्थ संकल्प सादर करताना केली.

विविध विभागाअंतर्गत असलेल्या सध्याच्या रुग्णालय पायाभूत सुविधांचा उपयोग करत नवी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत. यासाठी सध्याच्या रुग्णालय पायाभूत सुविधा तपासत वैद्यकीय महाविद्यालयांसाठी शिफारस करण्याकरिता समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या नव्या वैद्यकीय महाविद्यालयांमुळे युवकांना डॉक्टर होण्याची संधी मिळण्याबरोबरच जनतेसाठी आरोग्य सेवेतही सुधारणा होणार आहे.

- Advertisement -

द्विपक्षीय गुंतवणूक करारावर स्वाक्षरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज भारत आणि  संयुक्त अरब अमिराती दरम्यान  द्विपक्षीय गुंतवणूक करारावर स्वाक्षरी करण्यास आणि मान्यता देण्यास मंजुरी दिली. या करारामुळे गुंतवणूकदारांचा, विशेषत: मोठ्या गुंतवणुकदारांचा आत्मविश्वास वाढेल अशी अपेक्षा आहे, परिणामी परदेशी गुंतवणूक आणि थेट परदेशी गुंतवणूक संधींमध्ये वाढ होईल आणि याचा रोजगार निर्मितीवर सकारात्मक प्रभाव पडू  शकेल. या मंजुरीमुळे भारतातील गुंतवणूक वाढण्याची शक्यता असून देशांतर्गत निर्मितीला प्रोत्साहन मिळेल, आयातीवरील अवलंबित्व कमी होईल , निर्यात वाढेल आणि परिणामी आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल.

(हेही वाचा: BUDGET 2024 : समावेशक विकासामुळे दोन्ही ‘जीडीपी’त वाढच – निर्मला सीतारामन )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -