घरदेश-विदेशBudget 2024 : मोदी सरकारकडून लक्षद्वीपसाठी मोठी घोषणा; मालदीवला बोचणार काटे

Budget 2024 : मोदी सरकारकडून लक्षद्वीपसाठी मोठी घोषणा; मालदीवला बोचणार काटे

Subscribe

नवी दिल्ली : केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारचा दुसऱ्या टर्ममधील शेवटचा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी त्यांच्या कार्यकाळातील सहावा अंतरिम अर्थसंकल्प (Six Budget) आज (1 फेब्रुवारी) सादर केला. यावेळी मालदीवसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने 2024 च्या अंतरिम बजेटमध्ये लक्षद्वीपबाबत मोठी घोषणा केली आहे. (Budget 2024 Big announcement for Lakshadweep by Modi government Thorns will touch the Maldives)

आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर सरकार पूर्ण भर देईल. तसेच सरकार देशभरातील पर्यटन क्षेत्रात लक्षणीय गुंतवणूक करणार आहे. यामुळे लोकांचा देशांतर्गत पर्यटन, बंदर कनेक्टिव्हिटी, पर्यटन पायाभूत सुविधा आणि सुविधांबद्दलचा वाढता उत्साह पूर्ण करण्यासाठी लक्षद्वीप आणि आमच्या इतर बेट समूहांमध्ये सुधारणा केल्या जातील आणि त्यासाठी प्रकल्प सुरू केले जातील. त्यामुळे रोजगार निर्मितीलाही मदत होईल.

- Advertisement -

हेही वाचा – Raghuram Rajan : आपल्या देशात दोन भारत, एक चीनपेक्षा वेगाने पुढे, तर दुसरा…; वक्तव्य चर्चेत

मालदीव आणि भारत यांच्यातील राजनैतिक तणाव

मोहम्मद मुइज्जू यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मालदीवमध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला होता. मुइझू आणि त्यांचा पक्ष पीपल्स नॅशनल काँग्रेसला चीन समर्थक म्हणून पाहिले जाते. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष पहिल्यांदा भारताला भेट देतात, परंतु मुइझ्झू यांनी ही परंपरा मोडून प्रथम तुर्कीला भेट दिली. याशिवाय त्यांनी भारत सरकारला मालदीवमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय सैनिकांना मागे घेण्यास सांगितले. तसेच त्यांनी मालदीवमधून भारतीय सैन्य मागे घेण्यासाठी 15 मार्चचा अल्टिमेटम दिला आहे. सुमारे 70 भारतीय सैनिक मालदीवमध्ये डॉर्नियर 228 सागरी गस्ती विमान आणि दोन एचएएल ध्रुव हेलिकॉप्टरसह तैनात आहेत. मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारत आणि मालदीव यांनी 14 जानेवारी रोजी बेट राष्ट्रातून भारतीय सैन्य माघारी घेण्याबाबत सहमती दर्शवली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Budget 2024 : अमित शहांपेक्षा राजनाथ सिंह यांच्या खात्याला जास्त फंड; कोणाला किती निधी?

पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर पुन्हा वाद वाढला

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी काही डिसेंबर 2023 मध्ये लक्षद्वीप दौरा केला. यावेळी त्यांनी लक्षद्वीपची स्तुती करताना काही फोटो पोस्ट करत भारतातील पर्यटनाला चालना देण्यावर भर दिला होता. यानंतर भारतातील लोकांनी लक्षद्वीपला मालदीवचा पर्याय म्हणून आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली. अशावेळी मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी केली. अशातच अभिनेता सलमान खान, अक्षय कुमार आणि श्रद्धा कपूर यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी आणि क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद, सचिन तेंडुलकर, हार्दिक पंड्या यांनी चाहत्यांना भारतीय पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले होते. लक्षद्वीप आणि मालदीव वाद वाढत असल्याचे पाहून पंतप्रधान मोदींविरोधात ‘अपमानास्पद टिप्पणी’ पोस्ट केलेल्या तीन मंत्र्यांना निलंबित आले. यावेळी मालदीव सरकारने म्हटले होते की, ही त्यांची वैयक्तिक मते आहेत आणि सरकारच्या त्यांच्या विचारांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -