घरBudget 2024BUDGET 2024 : समावेशक विकासामुळे दोन्ही 'जीडीपी'त वाढच - निर्मला सीतारामन

BUDGET 2024 : समावेशक विकासामुळे दोन्ही ‘जीडीपी’त वाढच – निर्मला सीतारामन

Subscribe

नवी दिल्ली : केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारचा दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी त्यांच्या कार्यकाळातील सहावा अर्थसंकल्प (Six Budget) आज (1 फेब्रुवारी) सादर केला. यावेळी “सकल देशांतर्गत उत्पादनाच्या बाबतीत उच्च वाढ नोंदवण्याबरोबरच, अधिक सर्वसमावेशक ‘जीडीपी’ देखील, शासन (गव्हर्नन्स), विकास (डेव्हलपमेंट) आणि कामगिरी (परफॉर्मन्स ) वरच आहे,” असे प्रतिपादन निर्मला सीतारामन यांनी आज केले. (BUDGET 2024 Both GDP will increase due to inclusive development Nirmala Sitharaman)

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, केंद्र सरकारने ‘नागरिक-प्रथम’ आणि ‘किमान सरकार, कमाल शासन’ या दृष्टिकोनासह पारदर्शक, उत्तरदायी, लोक केंद्रीत आणि तत्पर विश्वासावर आधारित प्रशासन दिले आहे. अर्थव्यवस्था उत्तम प्रगती करत असून गुंतवणुकीतील वाढ आणि बाह्य क्षेत्रासह व्यापक आर्थिक स्थैर्य तसेच सर्वांगीण विकासाचा प्रभाव सर्व क्षेत्रांमध्ये दिसून येत आहे, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा – Uddhav Thackeray : मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे…, वाचा काय म्हणाले उद्धव ठाकरे?

लोक त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम, सुसज्ज आणि सक्षम होत आहेत. चांगले जीवनमान आणि चांगले उत्पन्न यासह भविष्यासाठी आणखी मोठ्या आकांक्षा, लोकांच्या सरासरी वास्तविक उत्पन्नात 50 टक्क्यांनी वाढ, चलनवाढीवर नियंत्रण, विविध कार्यक्रम, मोठ्या प्रकल्पांची प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी यातून हे दिसून येत आहे, असा विश्वास निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

आर्थिक व्यवस्थापन

गेल्या 10 वर्षांतील बहुआयामी आर्थिक व्यवस्थापन लोक केंद्रीत सर्वसमावेशक विकासाला पूरक ठरले आहेत, असे स्पष्ट करत निर्मला सीतारामन यांनी काही प्रमुख घटक खालीलप्रमाणे असल्याचे नमूद केले…
1. सर्व प्रकारच्या पायाभूत, भौतिक, डिजिटल किंवा सामाजिक सुविधा विक्रमी वेळेत उभारल्या जात आहेत.
2. देशाचे सर्व भाग आर्थिक विकासात सक्रिय सहभागी होत आहेत.
3. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, 21 व्या शतकातील नवीन ‘उत्पादनाचा घटक’ असून अर्थव्यवस्थेच्या औपचारिकीकरणासाठी महत्त्वपूर्ण आहे.
4. वस्तू आणि सेवा कराने ‘एक राष्ट्र, एक बाजारपेठ, एक कररचना’ सक्षम केली आहे. कर सुधारणांमुळे करव्यवस्थेची व्यप्ती रुंदावली आहे.
5. आर्थिक क्षेत्राच्या बळकटीकरणामुळे बचत, पतपुरवठा  आणि गुंतवणूक अधिक कार्यक्षम होण्यास मदत झाली आहे.
6. GIFT-IFSC आणि एकत्रित नियामक प्राधिकरण आयएफेससीए (International Financial Services Centers Authority) अर्थव्यवस्थेसाठी जागतिक भांडवल आणि वित्तीय सेवांसाठी एक मजबूत मार्ग आखत आहेत.
7. सक्रिय चलनवाढ व्यवस्थापनामुळे चलनवाढ धोरणात्मक मर्यादेत राखण्यास मदत झाली आहे.

हेही वाचा – PM Modi on Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान मोदींकडून कौतुक, म्हणाले “देशाच्या भविष्याचा अर्थसंकल्प” 

अमृत काळ म्हणजे कर्तव्य काळ

सध्याच्या काळाला कर्तव्य काळाचा प्रारंभ म्हणत निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या संबोधनातील वाक्य सांगितले, “देश अमाप संधी आणि संभावना खुल्या करत असताना नव्या प्रेरणा, नवा विवेक, नवे संकल्प याद्वारे आम्ही राष्ट्रीय विकासासाठी कटिबद्ध आहोत.”

युवावर्गामध्ये उद्यमशीलतेची भावना

पीएम मुद्रा योजनेअंतर्गत सुमारे 22.5 लाख कोटी रुपयांच्या कर्जांना मंजुरी दिल्यामुळे आपल्या युवा वर्गात उद्यमशीलतेची भावना निर्माण झाली आहे. त्याशिवाय फंड ऑफ फंड्स, स्टार्ट अप इंडिया आणि स्टार्ट अप क्रेडीट गॅरंटी स्कीम या योजना युवा वर्गाला पाठबळ देत आहेत आणि ते रोजगारदाता देखील बनत आहेत, असेही निर्मला सीतारामन म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -