घरBudget 2024Budget 2024 : विमानापासून आरोग्यापर्यंत अर्थसंकल्पात 'या' घोषणा; वाचा एका क्लिकवर

Budget 2024 : विमानापासून आरोग्यापर्यंत अर्थसंकल्पात ‘या’ घोषणा; वाचा एका क्लिकवर

Subscribe

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी क्षेत्रासह, नवीन विमान खरेदी आणि आरोग्यासह कर प्रणालीबाबतही मोठी घोषणा केली. तेव्हा हा अंतरिम अर्थसंकल्पातील महत्त्वाचे खास वाचकांसाठी. (Budget 2024 From aircraft to health what was announced in the budget Read in one click)

एक हजार नवीन विमाने खरेदी करणार

अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थममंत्री निर्मला सीतारामन यांनी विमान सेवेसंबंधी मोठी घोषणा केली. देशातील विमान वाहतूक क्षेत्रासाठी घोषणा करताना अर्थमंत्री म्हणाल्या की, आता देशात 149 विमानतळे आहेत. उडान अंतर्गत टियर-2 आणि टियर-3 शहरांचा विस्तार केला जात आहे. देशातील विमान वाहतूक कंपन्या एक हजार नवीन विमाने खरेदी करणार असल्याचीही घोषणा त्यांनी अंतरिम अर्थसंकल्पात केली.

- Advertisement -

हेही वाचा : Budget 2024: टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी लस देणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी आरोग्यसंबंधी मोठी घोषणा केली. आरोग्यसंबंधी घोषणा करताना त्या म्हणाल्या की, सध्याच्या आरोग्य पायाभूत सुविधांचा वापर करून आम्ही अधिक वैद्यकीय महाविद्यालये निर्माण करू. आमचे सरकार 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी लस देणार असल्याचीही घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. मातृत्व आणि बालकांच्या विकासासाठी सर्वसमावेशक योजना तयार केली जाणार असून, अंगणवाडी केंद्रे अद्ययावत करण्यात येणार आहेत. पोषण 2.0 ची अंमलबजावणी जलद केली जाईल. लसीकरण बळकट केले जाईल. आयुष्मान भारत अंतर्गत, सर्व आशा आणि अंगणवाडी सेविकांना त्याच्या कक्षेत आणले जाण्याचाही माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा : Budget 2024 : शेतपिकांचे नुकसान टाळण्यासाठी पावले उचलू; अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती

मध्यमवर्गीयांना घरे मिळतील

मध्यमवर्गीयांसाठी योजना तयार केली जाईल. भाड्याची घरे, झोपडपट्ट्या आणि अनियमित घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना नवीन घर विकत घेण्याची किंवा बांधण्याची संधी मिळेल. पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण या अंतर्गत तीन कोटी घरे बांधली जाणार आहेत. त्यापैकी दोन कोटी घरे येत्या पाच वर्षांत बांधण्यात येणार असल्याचीही घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -