नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री सर्वसामान्यांच्या बँक बचत खात्यात ठेवलेल्या पैशांवरील करमुक्त व्याजाची मर्यादा एका आर्थिक वर्षात 10 हजार रुपयांनी वाढवू शकतात. या नियमानुसार, एका वर्षात 10 हजार रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त मानले जाते. लोकांना दिलासा देण्यासाठी सरकार ही मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत वाढवू शकते, असा अंदाज आहे. (Budget 2024 Good news for investors Interest tax free on so much amount)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2024 रोजी सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कारण त्यानंतर देशभरात लोकसभा निवडणुका होणार आहेत. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात सरकारने सर्वसामान्यांना कर आणि स्टॅंडर्ड कपातीत दिलासा दिला होता. यावेळीही सरकार या दिशेने घोषणा करू शकते, असे मानले जात आहे.
हेही वाचा : Budget 2024: पायाभूत सुविधांपासून संरक्षण आणि रेल्वेपर्यंत…; अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा
प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 80 टीटीएनुसार, जर एखादी व्यक्ती (60 वर्षांपेक्षा कमी वयाची) बँका, पोस्ट ऑफिस किंवा सहकारी संस्थांमध्ये ठेवलेल्या खात्यातून व्याज उत्पन्न मिळविले तर तो वजावटीचा दावा करू शकतो. एकूण उत्पन्नातून 10 हजार रुपयांपर्यंत करता येते. करदात्यांना एफडी, रिकरिंग, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट इत्यादींवर मिळालेल्या व्याजासाठी या कपातीचा लाभ घेता येणार नाही. तर 60 वर्षांवरील लोकांसाठी, कलम 80TTB अंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंतची स्वतंत्र वजावट उपलब्ध आहे, जी बचत खाती, एफडी आणि इतर व्याज उत्पन्नावर लागू आहे.
हेही वाचा : Bihar Politics : भाजपावाले म्हणजे बाजारातले सगळ्यात मोठे खरेदीदार, ठाकरे गटाची टीका
2012 पासून सुरु करण्यात आली कपात
लहान बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने 2012 च्या अर्थसंकल्पामध्ये कलम 80टीटीए अंतर्गत कपात सुरू करण्यात आली होती. मात्र, तेव्हापासून कपातीची मर्यादा कायम आहे. असे मानले जात आहे की, सरकार ही कपात सध्याच्या 10 हजार रुपयांवरून 50 हजार रुपयांपर्यंत वाढवू शकते. सरकार यावर विचार करण्याची शक्यता आहे. सध्या बचत खात्यावरील व्याज खूपच कमी आहे: सध्या बचत खात्यावर वार्षिक 3-4 टक्के व्याज दिले जाते. एफडीवर 7 ते 8.60 टक्के व्याज मिळते. मात्र, काही खासगी बँका बचत खात्यांवर सात टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत, मात्र त्यासाठी खात्यात एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रक्कम असावी.