घरBudget 2024Budget 2024 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ठोस आर्थिक तरतूद करा; किसान सभेची मागणी

Budget 2024 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ठोस आर्थिक तरतूद करा; किसान सभेची मागणी

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी अंतरीम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरुवात होणार आहे. तेव्हा या अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्रासाठी भरीव घोषणा करावी अशी मागणी अखिर भारतीय किसान सभेने केली आहे.

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरुवात होणार आहे. या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी भरीव घोषणा होण्याची शक्यता आहे. असे असतानाच या अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. तेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नाशवंत शेतीमालाला भाव संरक्षण देण्यासाठी अर्थसंकल्पात ठोस व भरीव तरतूद करावी अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने केली आहे. (Budget 2024 Make solid financial provision for farmers in the budget Demand of Kisan Sabha)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी अंतरीम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरुवात होणार आहे. तेव्हा या अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्रासाठी भरीव घोषणा करावी अशी मागणी अखिर भारतीय किसान सभेने केली आहे.

- Advertisement -

अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी अर्थसंकल्पीय अविधेशनातून शेतकऱ्यांसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली आहे. त्यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले की, सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे आधीच देशभरातील कृषी क्षेत्रावर संकट ओढवले आहे. यामुळे शेतकरी अधिकाधिक संकटात सापडले जात आहेत. नव्या अर्थसंकल्पामध्ये ही बाब लक्षात घेऊन शेतीसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्याची नितांत आवश्यकता आहे. गेल्या वर्षभरात कांदा, टोमॅटो, दूध, बटाटा, फळे, भाजीपाला उत्पादक शेतकरी वारंवार संकटात सापडल्याचे आतापर्यंतच्या स्थितीवरुन दिसून येते. सरकारची शेतकरीविरोधी धोरणे व नैसर्गिक आपत्तीमुळे नाशवंत पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक हानीचा सामना करावा लागला आहे. अर्थमंत्री सीतारामण ही बाब लक्षात घेऊन नाशवंत शेतीमालाला भाव संरक्षण देण्यासाठी अर्थसंकल्पात ठोस व भरीव तरतूद करण्याची आवश्यकता असल्याची मागणी डॉ. अजित नवले यांनी केली आहे.

हेही वाचा : Prakash Ambedkar : मविआच्या पत्रावर आंबेडकरांची सूचक पोस्ट, म्हणाले – ‘सामील होणार पण…’

- Advertisement -

अरुण जेटलींच कौतुक आणि सीतारामण यांच्यावर निशाणा

आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी तत्कालीन अर्थमंत्री यांच्या नीतीचं कौतुक करत विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यावर निशाणा साधला.

नवले त्यांच्या निवेदनात म्हटले की, भाजीपाला, फळे व इतर नाशवंत शेतीमालाला संरक्षण देण्यासाठी तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2018-19 मध्ये 500 कोटी रुपयांची तरतूद करून ‘ऑपरेशन ग्रीन’ ही योजना आणली होती. नाशवंत शेतीमालाच्या बाजारभावातील चढउतारांपासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी, भावस्थिरीकरण कोष व नाशवंत शेतीमाल साठवणुकीसाठी शीतगृहे व गोदामे उभारण्यासाठी व प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी ही योजना बनविण्यात आली होती, असेही डॉ, नवले यांनी म्हटले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही मागील दोन अर्थसंकल्पात नाशवंत शेतीमाल उत्पादकांना संरक्षण देण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. प्रत्यक्षात मात्र सरकारने या विपरीत कृती करत असल्याचा हल्ला नवलेंनी केला आहे.

हेही वाचा : BMC Budget 2024 : यंदाचे बजेट 3 हजार कोटींनी वाढण्याची शक्यता; 2 किंवा 3 फेब्रुवारीला होणार सादर

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

केंद्रावर निशाणा साधताना डॉ. अजित नवले यांनी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, केंद्र सरकारने नाशवंत शेतीमालाचे भाव वारंवार पाडले. नेपाळवरुन टॉमेटो आणून, कांद्याचे निर्यात मूल्य वाढवून, दूध पावडर आयात करून व प्रसंगी कांद्यावर निर्यातबंदी लादून सरकारने शेतकऱ्यांना तोट्यात ढकलले. नव्या अर्थसंकल्पात सरकारने शेतकऱ्यांच्या या नुकसानीची भरपाई केली पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -