घरBudget 2024Budget 2024 : मोदी सरकार 2014 पूर्वीची आणि आताच्या अर्थव्यवस्थेवर काढणार श्वेतपत्रिका

Budget 2024 : मोदी सरकार 2014 पूर्वीची आणि आताच्या अर्थव्यवस्थेवर काढणार श्वेतपत्रिका

Subscribe

 संसदेमध्ये आज अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले, 2014 मध्ये ज्यावेळी आमच्या सरकारने सत्तेची धुरा सांभाळली त्यावेळी अर्थव्यवस्थेत टप्प्याटप्प्याने सुधारणा करण्याची आणि शासन प्रणाली व्यवस्थित करण्याची आमच्यावर प्रचंड मोठी जबाबदारी होती.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (1 फेब्रुवारी) सभागृहात अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी सभागृहात सांगितले की, मागील दहा वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेने झपाट्याने प्रगती केली आहे. सीतारामन म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने खूप प्रगती केली आहे. तेव्हा दहा वर्षांच्या आधीची स्थिती आणि आताच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर श्वेतपत्रिका काढणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. (Budget 2024 Modi government will release a white paper on the economy before 2014 and now)

संसदेमध्ये आज अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले, 2014 मध्ये ज्यावेळी आमच्या सरकारने सत्तेची धुरा सांभाळली त्यावेळी अर्थव्यवस्थेत टप्प्याटप्प्याने सुधारणा करण्याची आणि शासन प्रणाली व्यवस्थित करण्याची आमच्यावर प्रचंड मोठी जबाबदारी होती. लोकांना दिलासा देण्याची, गुंतवणूक आकर्षित करण्याची आणि अतिशय गरजेच्या असलेल्या सुधारणांना पाठबळ देण्याची काळाची गरज होती. आमच्या सरकारने ठाम धारणेच्या बळावर यशस्वीरित्या ते करून दाखवले अशीही माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

हेही वाचा : Election 2024 : महाविकास आघाडीचे 48 पैकी 34 जागांवर ठरलं; मात्र ‘या’ 14 जागांचा तिढा कायम

2014 मध्ये कुठे आता कुठे? स्पष्ट होणार

पंतप्रधान मोदी सत्तेत येण्याआधीची अर्थव्यवस्था आणि आताची अर्थव्यवस्था याविषयी बोलताना, केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या, “ त्या वर्षांमध्ये निर्माण झालेल्या संकटांवर मात करण्यात यश आले आहे आणि सर्वंकष विकासासह अतिशय उच्च शाश्वत वृद्धीच्या कक्षेत अर्थव्यवस्थेला भक्कमपण स्थापित करण्यात आले आहे. 2014 पर्यंत आपण कुठे होतो आणि आता आपण कुठे आहोत, हे पाहाण्यासाठी आणि त्या वर्षांमध्ये केलेल्या गैरव्यवस्थापनांपासून केवळ धडा घेण्यासाठी सरकार अर्थव्यवस्थेची पूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती यावर सभागृहात श्वेतपत्रिका सादर करेल, अशी घोषणा त्यांनी केली.

- Advertisement -

निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या, शासन, विकास आणि कामगिरी, प्रभावी वितरण आणि जनकल्याणाच्या आदर्श कामगिरीने सरकारला जे काही आवश्यक आहे ते साध्य करण्यासाठी आणि आगामी वर्षांत आणि दशकात चांगला हेतू, वास्तविक समर्पिकतेने आणि परिश्रमाने विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी जनतेचा विश्वास मिळाला आहे असेही यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

हेही वाचा : MVA : महाविकास आघाडीकडून संभाजीराजेंना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता

अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सभागृहात सांगितले की, ‘जेव्हा आम्ही 2014 मध्ये सत्तेची सूत्रे हाती घेतली, तेव्हा अर्थव्यवस्था सरळ करण्याची आणि शासन व्यवस्था योग्य मार्गावर आणण्याची जबाबदारी मोठी होती. सबका विकास या मंत्राने सरकारने या आव्हानांचा सामना केला.

युवा, गरीब, महिला आणि शेतकरी वर्गासाठी योजनांची घोषणा सीतारमण यांनी केली. 2047 पर्यंत भारताला विकसीत भारत करण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलंय. आयुष्मान भारत योजना यापुढे आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांनाही लागू असणार आहे. लखपती दीदी योजनेचं लक्ष्य दोन कोटींवरून तीन कोटी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -