घरदेश-विदेशBudget 2024 : अमित शहांपेक्षा राजनाथ सिंह यांच्या खात्याला जास्त फंड; कोणाला...

Budget 2024 : अमित शहांपेक्षा राजनाथ सिंह यांच्या खात्याला जास्त फंड; कोणाला किती निधी?

Subscribe

नवी दिल्ली : केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारचा दुसऱ्या टर्ममधील शेवटचा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी त्यांच्या कार्यकाळातील सहावा अंतरिम अर्थसंकल्प (Six Budget) आज (1 फेब्रुवारी) सादर केला. एका तासापेक्षा कमी कालावधीच्या आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन यांनी गेल्या 10 वर्षातील सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकताना स्पष्ट केले की, देश ‘नाजूक अर्थव्यवस्था’ श्रेणीतून बाहेर आला आहे आणि जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. त्यामुळे सरकार जुलैच्या अर्थसंकल्पात भारताला विकसित देश बनवण्यासाठी विस्तृत रोडमॅप सादर करेल. या अंतरिम अर्थसंकल्पात विविध मंत्रालयांसाठीही अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला असून त्यात संरक्षण मंत्रालयाला सर्वाधिक बजेट मिळाले आहे. (Budget 2024 More funds to Rajnath Singh than Amit Shah How much funding to whom)

हेही वाचा – Budget 2024 : सीतारामन यांनी बजेट वाचून दाखवलेल्या आयपॅडची किंमत किती; घ्या जाणून…

- Advertisement -

कोणत्या मंत्रालयाला किती बजेट मिळाले?

  1. संरक्षण मंत्रालय : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प 2024 मध्ये संरक्षण मंत्रालयाला सर्वाधिक बजेट दिली आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही भारताच्या संरक्षणासाठी नवीन डीप-टेक तंत्रज्ञान आणणार आहोत. यामुळे आत्मनिर्भरतेत वाढ होईल. तसेच 2023-24 या वर्षासाठी संरक्षण बजेट 6.02 लाख कोटी रुपये होते. जे गेल्या आर्थिक वर्षीच्या तुलनेत 13 टक्के अधिक होते. मात्र यावेळी त्या वाढ करून 6.20 लाख कोटी रुपये केले आहे. म्हणजेच 3.4 टक्कांनी वाढ झाली आहे.
  2. गृह मंत्रालय : या अर्थसंकल्पात अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील गृह मंत्रालयाला 2.03 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2023-24 च्या अर्थसंकल्पात गृह मंत्रालयाला 1.96 लाख कोटी रुपये मिळाले होते. म्हणजेच यावेळी या मंत्रालयाच्या बजेटमध्ये वाढ करण्यात आली आहे.
  3. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय : नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाच्या बजेटमध्येही यावेळी वाढ करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांच्या अंतर्गत देशात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. अर्थसंकल्पात या मंत्रालयासाठी 2.78 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  4. रेल्वे मंत्रालय : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या रेल्वे मंत्रालयाला 2.55 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. आर्थिक वर्ष 2023 मध्ये रेल्वे मंत्रालयाला 2.4 लाख कोटी रुपये मिळाले होते. याशिवाय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तीन मोठ्या रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करतानाच देशातील 40 हजार ट्रेनचे डबे वंदे भारतमध्ये रूपांतरित केले जातील, अशी माहिती दिली.
  5. ग्राहक व्यवहार आणि अन्न प्रक्रिया मंत्रालय : अंतरिम अर्थसंकल्पात या मंत्रालयाला 2.13 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. देशातील तळागाळातील ग्राहक चळवळीला चालना देण्यासाठी विशिष्ट विभागाची आवश्यकता लक्षात घेऊन जून 1997 मध्ये स्वतंत्र विभाग म्हणून त्याची स्थापना करण्यात आली.
  6. ग्रामीण विकास मंत्रालय : अंतरिम अर्थसंकल्पात ग्रामीण विकास मंत्रालयाला 1.77 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. ग्रामीण विकास मंत्रालयाला 2023-24 मध्ये 1,57,545 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. म्हणजेच यावेळी या मंत्रालयाच्या बजेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. याशिवाय विविध मंत्रालयांच्या बजेटमध्येही वाढ करण्यात आली आहे. रसायने आणि खते मंत्रालयाला 1.68 लाख कोटी रुपये, दळणवळण मंत्रालयाला 1.37 लाख कोटी रुपये आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाला 1.27 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत.

हेही वाचा – Prakash Ambedkar : अंतरिम बजेटमध्ये फक्त ज्ञान सादर केले; आंबेडकरांचा मोदी सरकारला टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -