घरBudget 2024Budget 2024: निर्मला सीतारामन यांच्या नावे 'असा'ही रेकॉर्ड; अर्थमंत्र्यांनी मोडला स्वतःचाच विक्रम

Budget 2024: निर्मला सीतारामन यांच्या नावे ‘असा’ही रेकॉर्ड; अर्थमंत्र्यांनी मोडला स्वतःचाच विक्रम

Subscribe

आज निर्मला सीतारामन यांनी 56 मिनिटांचे अर्थसंकल्पीय भाषण केले आणि त्यांनी स्वत:च्याच नावावर असलेला विक्रम मोडीत काढला.

Budget Speech 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सरकारच्या कामगिरीची गणना केली. या बजेटमध्ये तीन महिन्यांसाठी खर्च करायच्या रकमेचा लेखाजोखा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अर्थसंकल्प सर्वांसाठी चांगला असल्याचे सांगितले. आज निर्मला सीतारामन यांनी 56 मिनिटांचे अर्थसंकल्पीय भाषण केले आणि त्यांनी स्वत:च्याच नावावर असलेला विक्रम मोडीत काढला. सर्वात लांब आणि सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषण कधी दिले गेले ते जाणून घेऊया. (Budget 2024 Nirmala Sitharaman s such record Finance Minister broke his own record)

स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा अर्थसंकल्प वाचण्याचा विक्रम

गेल्या आर्थिक वर्षात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वात छोटे भाषण केले, जे केवळ 87 मिनिटांचे होते. आता त्यांनी केवळ 56 मिनिटांचे बजेट वाचले आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:चाच विक्रम मोडला आहे. तसंच, स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त वेळ बजेट वाचण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. त्यांनी 2021 मध्ये 2 तास 40 मिनिटांचं अर्थसंकल्पाचं वाचन केलं होतं, जे आतापर्यंतचं सर्वात मोठं भाषणं होतं.

- Advertisement -
पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला

स्वातंत्र्यानंतरचा भारताचा पहिला अर्थसंकल्प सीडी देशमुख यांनी 1951 मध्ये सादर केला होता.

निर्मला सीतारामन यांनी 2021 मध्ये सर्वात मोठे भाषण केले

केंद्रीय अर्थसंकल्प 2021 चे अर्थसंकल्पीय भाषण हे आतापर्यंतचे सर्वात मोठे अर्थसंकल्पीय भाषण आहे, जे 2 तास 40 मिनिटे चालले. यापूर्वी त्यांनी 2020 मध्ये 2019-20 या आर्थिक वर्षासाठी असेच भाषण दिले होते, जे विक्रमी 2 तास 17 मिनिटे चालले होते. यावर्षी त्यांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांच्या आधी, जसवंत सिंह यांच्या नावावर सर्वाधिक प्रदीर्घ अर्थसंकल्पीय भाषण करण्याचा विक्रम आहे, त्यांनी 2003 मध्ये 2 तास 13 मिनिटांचे भाषण केले होते. दिवंगत अरुण जेटली यांनी 2014 मध्ये 2 तास 10 मिनिटांचे भाषण केले होते.

- Advertisement -

निर्मला सीतारामन यांच्या आधी भाजप नेते जसवंत सिंह यांच्या नावावर सर्वाधिक प्रदीर्घ अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम होता. 2003 मध्ये त्यांनी 2 तास 15 मिनिटांचा अर्थसंकल्प सादर केला होता.

मनमोहन सिंग यांचं अत्यंत शब्दबद्ध भाषण 

अर्थसंकल्पीय भाषणाबद्दल बोलायचे झाले तर 1991 मध्ये अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी सर्वात मोठे भाषण केले होते. त्यांच्या भाषणात 18 हजार 650 शब्द होते.

सर्वात लहान भाषण हिरुभाई एम पटेल यांच्या नावावर

सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषण देण्याचा विक्रम हिरुभाई एम पटेल यांच्या नावावर आहे, त्यांनी 1977 मध्ये केवळ 800 शब्दांचे बजेट भाषण वाचले होते. हे सर्वात लहान बजेट भाषण होते.

किती महिलांनी अर्थसंकल्प सादर केला?

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत फक्त दोनच महिलांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. 1970 मध्ये इंदिरा गांधी आणि 2019 मध्ये निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला.

स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. मोरारजी देसाई यांनी विक्रमी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर पी चिदंबरम यांनी 9 वेळा तर प्रणव मुखर्जी आणि यशवंत सिन्हा यांनी प्रत्येकी 8 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.

( हेही वाचा :Budget 2024 : मोदी सरकार 2014 पूर्वीची आणि आताच्या अर्थव्यवस्थेवर काढणार श्वेतपत्रिका )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -