घरBudget 2024Budget 2024: टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची...

Budget 2024: टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

Subscribe

आयकर आणि जीएसटी रचनेत कोणत्याही प्रकारे बदल करण्यात आलेला नाही. सर्व कर स्लॅब/दर तसेच ठेवण्यात आले आहेत.

नवी दिल्ली: आयकर आणि जीएसटी रचनेत कोणत्याही प्रकारे बदल करण्यात आलेला नाही. सर्व कर स्लॅब तसेच ठेवण्यात आले आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नसल्याची, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली आहे. (Budget 2024 No change in tax slab Union Finance Minister Nirmala Sitharaman s announcement)

करदात्यांना या बजेटमधून थोडीशी सूट दिली जाईल अशी पुसटशी अपेक्षा होती, मात्र करप्रणालीत कोणताही बदल न केला गेल्याने दुर्दैवाने ती पूर्ण झालेली नाही.

- Advertisement -

2023-24 मध्ये जो टॅक्स स्लॅब होता तोच टॅक्स स्लॅब 2024-25 मध्ये कायम राहणार आहे.

कर रचना अशी आहे

- Advertisement -
  • 0 ते 3 लाख रुपये – 0%
  • 3 ते 6 लाख रुपये – 5%
  • 6 ते 9 लाख रुपये – 10%
  • 9 ते 12 लाख रुपये – 15%
  • 12 ते 15 लाख रुपये – 20%
  • 15 लाखांहून अधिक रुपये – 30%

देशातील करदात्यांची संख्या 2.4 पटीने वाढली

सीतारामन यांनी माहिती दिली त्या म्हणाल्या, ‘प्रत्यक्ष कर संकलन 10 वर्षांत तीन पटीने वाढले आहे. करदात्यांची संख्या 2.4 पट वाढली आहे. देशाच्या विकासात करदात्यांच्या योगदानाचा उपयोग होत आहे. आम्ही करदात्यांची प्रशंसा करतो. सरकारने कराचे दर कमी केले आहेत. लागू करण्यात आलेल्या नवीन कर योजनेअंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंत कोणताही कर नाही. कॉर्पोरेट टॅक्सही कमी करण्यात आला आहे. नवीन फॉर्म 26AS सह कर भरणे सोपे झाले आहे. 2013-14 मध्ये 93 दिवसांऐवजी आता 10 दिवसांत परतावा दिला जात आहे, असं सीतारामन यांनी म्हटलं आहे.

2024-25 मध्ये एकूण 47.66 लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वित्तीय तूट जीडीपीच्या 5.1% असण्याचा अंदाज आहे, जी पुढील वर्षात 4.5% पर्यंत खाली आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. एफडीआयवर भर दिला जाईल म्हणजेच फर्स्ट डेव्हलप इंडिया म्हणजे विकास आधी भारतात येईल. राज्यांच्या सुधारणा योजनांसाठी 75 हजार कोटी रुपयांची तरतूद केली जात आहे. हे 50 वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज असेल. पुढील 25 वर्षे आमच्यासाठी कर्तव्याचा काळ असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या.

(हेही वाचा: Budget 2024 : विमानापासून आरोग्यापर्यंत काय करण्यात आली अर्थसंकल्पात घोषणा? वाचा एका क्लिकवर )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -