HomeBudget 2024Budget 2024 : सीतारामन यांनी बजेट वाचून दाखवलेल्या आयपॅडची किंमत किती; घ्या...

Budget 2024 : सीतारामन यांनी बजेट वाचून दाखवलेल्या आयपॅडची किंमत किती; घ्या जाणून…

Subscribe

नवी दिल्ली : केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारचा दुसऱ्या टर्ममधील शेवटचा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी त्यांच्या कार्यकाळातील सहावा अंतरिम अर्थसंकल्प (Six Budget) आज (1 फेब्रुवारी) सादर केला. याआधी निर्मला सीतारामन नेहमीप्रमाणे लाल कव्हरमध्ये डिजिटल टॅबलेट घेऊन संसेदत पोहोचल्या. संसदेत तिसऱ्यांदा पेपरलेस बजेट सादर करण्यात आले. मात्र तुम्हाला माहिती आहे का? निर्मला सीतारामन यांनी ज्या आयपॅडवर बजेट सादर केलं त्याची किंमत किती जाणून घेऊया… (Budget 2024 Seetharaman read out the budget and showed how much the iPad costs)

हेही वाचा – BUDGET 2024 : समावेशक विकासामुळे दोन्ही ‘जीडीपी’त वाढच – निर्मला सीतारामन 

निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राज्यमंत्री डॉ. भागवत किशनराव कराड, पंकज चौधरी आणि वित्त मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकारी होते. राष्ट्रपतींनी निर्मला सीतामान यांना दही आणि साखर देऊन निरोप दिला. यानंतर निर्मला सीतारामन निळी आणि क्रीम रंगाची टसर साडी परिधान करून नेहमीप्रमाणे डिजिटल टॅबलेट घेऊन संसेदत पोहोचल्या. त्यांच्या हातात ब्रीफकेसऐवजी सोनेरी राष्ट्रीय चिन्ह असलेल्या लाल कव्हरमध्ये टॅब्लेट ठेवण्यात आला होता.

आयपॅडची किंमत किती?

मिळालेल्या माहितीनुसार, मागच्यावर्षीप्रमाणे यंदाही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अॅपल आयपॅड (10th gen) ने बजेट सादर केलं. अॅपलच्या आयपॅडची किंमत 39,900 रुपये आहे. यामध्ये 64GB स्टोरेज वेरिंएटची क्षमता आहे, तर  याच आयपॅडच्या 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 54,900 रुपये आहे.

हेही वाचा – Budget 2024: आशा, अंगणवाडी सेविकांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा; आयुष्मान भारत योजनेत होणार समावेश 

सीतारामन यांनी मोरारजींच्या विक्रमाशी केली बरोबरी

दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासह त्यांनी मोरारजी देसाईंच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. मोरारजी देसाई यांनी दोन अंतरिम अर्थसंकल्प सादर केले (एक 1962 आणि दुसरा 1967) होते. याशिवाय त्यांनी एकूण 10 केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले आहेत.