घरBudget 2024Budget 2024 : शेतपिकांचे नुकसान टाळण्यासाठी पावले उचलू; अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती

Budget 2024 : शेतपिकांचे नुकसान टाळण्यासाठी पावले उचलू; अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती

Subscribe

अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प आहे. यावेळी अर्थमंत्री सहावा अर्थसंकल्प सभागृहात मांडत आहेत. मोरारजी देसाईंनंतर सीतारामन या दुसऱ्या अर्थमंत्री आहेत, ज्यांना सहा वेळा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्राच्या दृष्टीनेही मोठी घोषणा आहे. पीक काढणीनंतर होणारे नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकार ठोस पावले उलचणार असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. (Budget 2024 Take steps to prevent damage to crops Finance Minister Sitharamans information)

अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प आहे. यावेळी अर्थमंत्री सहावा अर्थसंकल्प सभागृहात मांडत आहेत. मोरारजी देसाईंनंतर सीतारामन या दुसऱ्या अर्थमंत्री आहेत, ज्यांना सहा वेळा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली.

- Advertisement -

अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचा 38 लाख शेतकऱ्यांना लाभ झाला असून 10 लाख रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. शेत पीक काढणीनंतरचे नुकसान टाळण्यासाठी विविध उपक्रमाववर काम केले जात आहे.

हेही वाचा : Budget 2024 : महिला, तरुण आणि गरिबांच्या उन्नतीचं उद्दीष्ट; अर्थमंत्री सीतारामनकडून बजेट मांडणं सुरू

- Advertisement -

कापणीनंतरच्या क्रियाकलापांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी मजबूत करू. स्वावलंबी तेलबिया अभियानाला बळ दिले जाईल. या अंतर्गत नवीन कृषी तंत्रज्ञान आणि कृषी विम्याला चालना दिली जाणार आहे. दुग्धव्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांनाही मदत केली जात आहे. राष्ट्रीय गोकुळ मिशनसारख्या योजना राबवल्या जात आहेत. मत्स्यसंपत्तीही बळकट केली जात आहे. सीफूड उत्पादन दुप्पट झाले आहे. मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून उत्पादकता तीन ते पाच टन प्रति हेक्टर वाढवली जाईल. 55 लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. पाच एकात्मिक एक्वा पार्क बांधले जातील.

हेही वाचा : Budget 2024: भारताला 2047 पर्यंत ‘विकसित’ बनवणार; भारत गरिबीमुक्त करणार, निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन

भारत-मध्य-पूर्व-युरोप कॉरिडॉर अत्यंत महत्त्वाचा

संसदेत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, भारत-मध्य-पूर्व-युरोप कॉरिडॉर हे भारत आणि इतर देशांसाठीही एक परिवर्तनकारी पाऊल आहे. अर्थमंत्री म्हणाल्या, ‘कोविड असूनही, आम्ही पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत 3 कोटी घरांचे बांधकाम पूर्ण केले. पुढील 5 वर्षांत आणखी 2 कोटी घरे बांधली जातील अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

एक कोटी घरांना सौरऊर्जेद्वारे मोफत वीज मिळणार

छतावरील सौरऊर्जेच्या माध्यमातून एक कोटी घरांना सौरऊर्जेद्वारे दरमहा 300 युनिट मोफत वीज मिळू शकेल. 15-18 हजार रुपयांची बचत होणार आहे. ई-वाहनांच्या चार्जिंगसाठी मोठ्या प्रमाणात स्थापना केली जाईल. त्यामुळे विक्रेत्यांना काम मिळेल अशीही घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -