LPG गॅस सिलिंडरवर Subsidy मिळणाऱ्यांना मोठा झटका, ग्राहकांच्या खात्यात Subsidy येणाऱ्यावर शंका?

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel) दरात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत होते. मात्र, आता LPG गॅस सिलिंडरवर Subsidy मिळणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका मिळणार आहे. अनुदान घेणाऱ्या लाखो ग्राहकांना आता बाजारभाव मोजावा लागणार आहे. आता फक्त ९ कोटी गरीब महिला आणि उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत कनेक्शन घेतलेल्या इतर लाभार्थ्यांना अनुदान मिळणार आहे.

सचिव पंकज जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२० पासून एलपीजीवर कोणतीही सबसिडी दिली जात नाहीये आणि फक्त तीच सबसिडी दिली जाते, ज्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २१ मार्च रोजी केली होती. कोविडच्या सुरुवातीच्या दिवसांपासून एलपीजी वापरकर्त्यांसाठी कोणतेही अनुदान नव्हते. तेव्हापासून फक्त तेच अनुदान होते, जे आता उज्ज्वला लाभार्थ्यांना दिले जात आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपयांची विक्रमी कपात करण्याची घोषणा करताना उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात १२ गॅस सिलेंडरसाठी प्रति सिलिंडर २०० रुपये सबसिडी मिळणार असल्याचे सांगितले होते.

हेही वाचा : LPG Cylinder Price: आजपासून सिलिंडरच्या दरात घसरण, नवे दर काय?

राजधानी दिल्लीत १४.२ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत १ हजार ३ रुपये आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट २०० रुपये सबसिडी जमा केली जाणार आहे. तसेच इतर दिल्लीतील विभागात त्याची किंमत १ हजार ३ रुपये असेल. २०० रुपयांच्या अनुदानावर सरकारला ६ हजार १०० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.


हेही वाचा : LPG Gas cylinder: डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या दरात १०० रुपयांची वाढ