घरताज्या घडामोडीBudget Session : संसदेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी- सोनिया गांधींची भेट, सोशल...

Budget Session : संसदेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी- सोनिया गांधींची भेट, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

Subscribe

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ८ एप्रिल रोजी संपणार होते परंतु एक दिवसपूर्वीच कामकाज समाप्त करण्यात आले आहे. संसदेच्या सत्रानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. या दरम्यान काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा फोटो व्हायरल होत आहे. यासोबतच फारुक अब्दुल्ला आणि मुलायम सिंह यादव यांच्या फोटोनेही सोशल मीडियावर लक्ष वेधले आहे.

संसदीय कामकाजाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नेरंद्र मोदी यांच्यासह संसदेचे सर्व सदस्य उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षाच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आहेत. यामध्ये काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत लोकसभा स्पीकर ओम बीरला आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. सोनिया गांधी नमस्कार करत कार्यालयात दाखल झाले आहेत. राष्ट्रीय राजकारणात असे कमी वेळा झाले आहे की, पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्यात भेट झाली आहे. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला असून नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहेत.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी जेव्हा सोनिया गांधी कार्यालयात दाखल झाल्या तेव्हा त्यांनी सर्व सदस्यांना नमस्कार केला परंतु त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली नजर खाली केली आहे. तर दुसऱ्या नेत्यांना भेटताना पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना नमस्कार करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर दूसरा फोटो नॅशल कॉन्फ्रेंसचे प्रमुख फारुक अब्दुल्ला आणि सपा संरक्षक मुलायम सिंह यादव यांच्या भेटीचा आहे. यामध्ये फारुक अब्दुल्ला सर्व नेत्यांना हात जोडून नमस्कार करताना दिसत आहेत. उत्तरामध्ये पंतप्रधान मोदी, ओम बिरला आणि राजनाथ सिंह उपस्थित होते.

- Advertisement -

फोटोची चर्चा का?

संसदेच्या कामकाजानंतर विरोधी पक्षनेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्या भेटीची चर्चा सुरु आहे. व्हायरल फोटोमध्ये सोनिया गांधी कार्यालयात आल्या तेव्हा त्यांनी सगळ्या सदस्यांना नमस्कार करताना दिसत आहेत. सोनिया गांधी यांनी मास्क लावला आहे तर इतर सदस्यांनी मास्क लावला नाही. सोनिया गांधी यांनी नमस्कार केल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा हात नमस्कार करण्यासाठी वर येत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी खाली बघत आहेत. लोकसभा स्पीकर ओम बिरला यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसतंय यामुळे हा फोटो चांगलाच चर्चेत राहिला आहे.


हेही वाचा : no confidence motion : इम्रान खान सरकारविरोधात ९ एप्रिलला अविश्वासाचा ठराव, पाकच्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -