घरBudget 2024Budget & Stock Market : बजेट सादर केले जात असतानाच शेअर बाजारात...

Budget & Stock Market : बजेट सादर केले जात असतानाच शेअर बाजारात घसरण!

Subscribe

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी सलग सहावा अर्थसंकल्प सादर केला आणि 56 मिनिटे भाषण केले, जे त्यांचे आतापर्यंतचे सर्वात लहान भाषण आहे. 

मुंबई : सर्वसामान्यांसह औद्योगिक क्षेत्रापासून कृषी क्षेत्र अंतर्भूत असलेला केंद्रीय अर्थसंकल्प आज 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प त्यांनी 56 मिनिटांत सादर केला. याच 56 मिनिटांत शेअर बाजारावरही परिणाम झाला. एकूणच या 56 मिनिटा दरम्यान काय घडलं? ते जाणून घेऊया. (Budget Vs Stock Market The stock market falls just as the budget is being presented What happened in 56 minutes)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी सलग सहावा अर्थसंकल्प सादर केला आणि 56 मिनिटे भाषण केले, जे त्यांचे आतापर्यंतचे सर्वात लहान भाषण आहे. मात्र या अर्थसंकल्पात गुंतवणूकदारांना उत्साह दिसून आला नाही. कारण, दिवसाअखेर निर्देशांक 106.81 अंकांनी (0.15 टक्के) घसरून 71,645.30 वर बंद झाला. यामध्ये विदेशातील समभागही घसरले. कारण गुणवणूकदारांना झालेल्या तोट्यामुळे आयटी क्षेत्रातील नफ्याला ग्रहण लागल्याचे दिसून आले. दरम्यान प्रश्न उरतो तो केंद्रीय अर्थमंत्री अंतरिम अर्थसंकल्प सादर करत असताना या दरम्यान शेअर बाजार कसा होता. तर तो आकड्यांच्या माध्यमातून समजून घेऊ.

- Advertisement -

हेही वाचा : Budget 2024: निर्मला सीतारामन यांच्या नावे ‘असा’ही रेकॉर्ड; अर्थमंत्र्यांनी मोडला स्वतःचाच विक्रम

वेळ            निर्देशांक

- Advertisement -

11          72044.93
11.05     72076.05
11.15     71989.12
11.30     71865.01
11.45      7188.07
11.56      71861.09

हेही वाचा : Election 2024 : महाविकास आघाडीचे 48 पैकी 34 जागांवर ठरलं; मात्र ‘या’ 14 जागांचा तिढा कायम

‘या’ निर्देशांकवर बंद झाला शेअर बाजार

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी त्यांच्या करिअरमधील सर्वात कमी म्हणजे 56 मिनिटात अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान या अर्थसंकल्पाचा थेट शेअर बाजारावर परिणाम झाला. आज सकाळी शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात होऊनही प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 107 अंकांनी घसरून 71,645 वर आला. निफ्टीही 28 अंकांनी घसरून 21,697 वर बंद झाला. बाजारात सर्वात मोठी घसरण मीडिया, फार्मा, रिअल्टी आणि हेल्थकेअर क्षेत्रात झाली. सरकारी बँकिंग, एफएमसीजी आणि वाहन क्षेत्रात खरेदी झाली. दिवसाअखेर 106.81 अंकांनी घसरून 71.645 अंकावर बंद झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -