घरदेश-विदेश'वंदे भारत'ला जनावरं धडकण्याच्या घटना काही थांबेना! वलसाडमध्ये आता बैलाची धडक

‘वंदे भारत’ला जनावरं धडकण्याच्या घटना काही थांबेना! वलसाडमध्ये आता बैलाची धडक

Subscribe

मुंबई ते गांधीनगरदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला गाय, बैल किंवा इतर जनावरं धडकण्याचे सत्र सुरुचं आहे. आता गुजरातमधील वलसाडमध्ये एक बैल वंदे भारतला धडकल्यामुळे गाडीचे नुकसान झाले आहे. मागील घटनेनंतरची ही पाचवी घटना आहे.

वंदे भारत ट्रेनला जनावर धडकल्याची ही गेल्या काही दिवसातील पाचवी घटना आहे. गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात गुरुवारी गांधीनगर – मुंबई मार्गावर धावणाऱ्या या ट्रेनसोबत हा अपघात झाला. या अपघातात ट्रेनच्या नोझल पॅनललचे किरकोळ नुकसान झाले आहे. मात्र या ट्रेनच्या धडकेत बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे. ज्याला कॅटल व्हॉलंटियर ग्रुपने बाजूला केले आहे.

- Advertisement -

पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, उद्वादा रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला आहे. रुळावरून धावणाऱ्या बैलाला वंदे भारत ट्रेनने धडक दिली. यानंतर ड्रायव्हरच्या केबिनखालील शंकूच्या आकाराच्या भागावर आदळला. ही ट्रेन अहमदाबादहून मुंबईला जात असताना सनजन रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली. येथे तांत्रिक आणि दुरुस्ती पथकाने खराब झालेल्या भागाची दुरुस्ती केली. बैलाच्या धडकेमुळे इंजिनचे काही नुकसान झाले का याची तपासणी करण्यात आली, अपघातामुळे ही गाडी सुमारे 20 मिनिटे लेट मुंबईच्या दिशेने रवाना झाली.

रेल्वे सुत्रांच्या माहितीनुसार, वंदे भारत ट्रेनला जनावराने धडक देण्याची ही घटना वलसाड जिल्ह्यात दुसऱ्यांदा घडली आहे. यापूर्वी 29 ऑक्टोबरला अतुल रेल्वे स्थानकातही असा अपघात झाला होता. एकूण देशातील आकडेवारी पाहिली तर वंदे भारत ट्रेनने जनावरांना धडक देण्याची ही पाचवी घटना आहे. वंदे भारतचं नाहीतर अनेक गाड्यांवर वलसाडदरम्यान जनावरं धडकली आहेत. यात 10 ऑक्टोबरमध्ये 19 गायी व वासरे, 25 ऑगस्ट रोजी पाच गायी आणि गतवर्षी जून महिन्यात नवसारीजवळ 18 गायींचा वेगवेगळ्या गाड्यांच्या धडकेत मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

सचिन सावंत यांचा भाजपावर निशाणा 

दरम्यान या घटनांवरून आज काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपवर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे. देशभरातील काही राज्यांत भाजपसाठी गाय मम्मी, गोवा अरुणाचलमध्ये भाजपसाठी गौमाता यम्मी. भाजपकडून गायीच्या नावावर जे राजकारण केले जात आहे त्यामुळे कदाचित गाय दुखावली गेली असावी, त्यामुळेच हे सातत्याने घडत आहे. अशी टीका सचिन सावंत यांनी भाजपवर केली आहे.


जी-२० चं अध्यक्षपद स्वीकारणं ही भारताच्या वाटचालीला नवं वळण देणारी घटना

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -