Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश मतांच्या धृवीकरणासाठी धार्मिक सलोख्यावर ‘बुलडोझर’, ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल

मतांच्या धृवीकरणासाठी धार्मिक सलोख्यावर ‘बुलडोझर’, ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल

Subscribe

मुंबई : स्वातंत्र्यप्राप्तीत सर्वच धर्म, जात, पंथांचे भरीव योगदान होते. मात्र त्या योगदानावरही मोदी सरकारच्या ‘सांस्कृतिक टोळधाडी’ अतिक्रमण करीत आहेत. स्वातंत्र्य चळवळीतील विशिष्ट नेत्यांची निंदानालस्ती करण्याचे विखारी प्रयोग राज्याराज्यांत सरकारी कृपेने सुरू आहेत. महाराष्ट्रासारखे पुरोगामी राज्यही यातून सुटलेले नाही. देशाच्या इतिहासाची विकृत मांडणी केली जात आहे. अभ्यासक्रमांमध्ये वैचारिक घुसखोरी करून सांस्कृतिक एकता भंग केली जात आहे. मतांच्या धृवीकरणासाठी धार्मिक सलोख्यावर ‘बुलडोझर’ फिरविले जात आहेत, असा हल्लाबोल ठाकरे गटाने भाजपा आणि केंद्र सरकारवर केला आहे.

हेही वाचा – राज्यकर्त्यांचा कारभार शुद्ध आहे का? ठाकरे गटाचा मोदी सरकारला थेट सवाल

- Advertisement -

सर्वधर्म स्वातंत्र्य हा देशाचा आत्मा आणि राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे. देशजीवनाचा मूलमंत्र आहे. मात्र सत्ताधाऱ्यांच्या नकली हिंदुत्वाच्या वरवंट्याखाली हे सर्वधर्म स्वातंत्र्यही चिरडले जाण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे सामना दैनिकातील अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने म्हटले आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा म्हणा किंवा इतर घटनात्मक व्यवस्था, म्हणायला ‘स्वतंत्र’ आणि ‘स्वायत्त’ असल्या तरी मोदी सरकार आल्यापासून त्यांनाही हुकुमाचे ताबेदार बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नोटाबंदी लादून आणि सरकारी बँका तसेच सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण करून सामान्य जनतेला आर्थिक पारतंत्र्यात ढकलले जात आहे, असा आरोप या अग्रलेखात करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पुढील वर्षी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना…, पंतप्रधान मोदी यांना विश्वास

नागरी स्वातंत्र्याचा संकोच
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करीत पाशवी बहुमताच्या आधारे नवे कायदे बनवले जात आहेत आणि येथील संघराज्य पद्धतीची चौकट मोडण्याचे कारस्थान सुरू आहे. एकीकडे ब्रिटिश कायद्यांचे जोखड फेकून नवे ‘सार्वभौम’ कायदे आणल्याचे ढोल पिटायचे आणि दुसरीकडे स्वतंत्र हिंदुस्थानच्या कायद्यांचा, नागरी स्वातंत्र्याचा संकोच करायचा. देशातील हे चित्र चिंताजनक असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.

नवी गुलामगिरी जन्माला घालण्याचे उद्योग
हिंदुस्थान हे एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहेच, परंतु हिंदुस्थानी घटनेने आणि लोकशाहीने जनतेला दिलेले अधिकार, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्य यांवर घाला घालून देशात नवी गुलामगिरी जन्माला घालण्याचे उद्योग मागील 9 वर्षांपासून सुरू आहेत. स्वातंत्र्यातील हे ‘पारतंत्र्य’ उलथवून टाकण्याची शपथ जनतेनेच आजच्या स्वातंत्र्यदिनाला साक्षी ठेवून घ्यायला हवी, असे आवाहन ठाकरे गटाने केले आहे.

- Advertisment -