घरदेश-विदेशमोक्ष मिळवण्यासाठी आत्महत्या?

मोक्ष मिळवण्यासाठी आत्महत्या?

Subscribe

गेली २२ वर्षे या परीसरात राहणाऱ्या कुटुंब अशा पद्धतीने कोणताही ताण नसताना आत्महत्या का करेल? अशी कुजबूजही होत होती. पण दुसरीकडे मृत शरीराचे तोंड आणि हात बांधलेल्या मृतदेहामुळे हा नेमका प्रकार काय याचा उलगडा होत नव्हता. पण तपासादरम्यान पोलिसांना घरात दोन रजिस्टर सापडले असून त्यात बऱ्याच गोष्टी लिहून ठेवल्या आहेत.

रविवारचा दिवस राजधानी दिल्लीसाठी हादरुन टाकणारा होता. बुराडी परीसरातील संतनगरमध्ये एकाच घरातील ११ जणांचे मृतदेह सापडले.  फासावर लटकलेले हे मृतदेह पाहता या कुटुंबाने आत्महत्या केल्याचा संशय आला होता. पण सोबतच हत्येचा संशयही पोलिसांना होता. मात्र, आता या सगळ्या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. मोक्ष मिळवण्यासाठी या कुटुंबाने आत्महत्या केल्याचा खळबळजनक खुलासा सध्या समोर येत आहे. या संदर्भात पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे. दरम्यान पोलिसांना सापडलेल्या काही पुराव्यातून डोकं चक्रावून टाकणारे मुद्दे समोर येत आहेत.

दोन रजिस्टरमध्ये मृत्यूचे कारण

बुराडी परीसरात भुवेश भाटीया हे कुटुंब राहते. या कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह रविवारी घरात छताला लटकलेल्या अवस्थेत सापडले. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे म्हटले जात होते. पण गेली २२ वर्षे या परीसरात राहणाऱ्या कुटुंब कुटुंब अत्यंत शांत कुटुंब होते. रोज या घरात सकाळ-संध्याकाळ भजने व्हायची. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही  मानसिक ताण असल्याचे कधीच जाणवले नाही. त्यामुळे इतके चांगले कुटुंब आत्महत्या का करेल? अशी कुजबूजही होत होती. पण दुसरीकडे मृत शरीराचे तोंड आणि हात बांधलेल्या मृतदेहामुळे हा नेमका प्रकार काय याचा उलगडा होत नव्हता. तपासादरम्यान पोलिसांना घरात दोन रजिस्टर सापडले असून त्यात बऱ्याच गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. यात त्यांनी असे का केले हे लिहून ठेवले आहे.जे वाचून हा सगळा प्रकार अंधश्रद्धेचा आहे हे समोर येत आहे.

- Advertisement -
burari_priyanka_engagement
प्रियांका भाटियाच्या साखरपुड्यातील क्षण
  • रजिस्टरमध्ये डोळ्यांवर पट्टी बांधलेली हवी. पट्टी बांधल्यानंतर शून्याशिवाय काहीच दिसता कामा नये. यासाठी सुती साड्यांचा उपयोग करायचा आहे
  • दिवस सतत पूजा करायची असून ही पूजा श्रद्धेने करणे गरजेचे आहे. या पुजेदरम्यान जर कोणी घरी आले तर पूजा त्याक्षणी थांबवून दुसऱ्या दिवशी करावी
  • पुजेसाठी गुरुवार आणि रविवार या दिवसांची निवड करण्यात आली आहे
  • रजिस्टरमध्ये म्हटले आहे की, घरातील वृद्ध महिला जर उभी राहू शकत नसेल तर तिला वेगळ्या खोलीत झोपवू शकता ( या वृद्ध महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आली)
  • हे करताना घरातल्या सगळ्यांचेच विचार सारखे असायला हवे. असे केल्यास तुमचे काम अधिक चांगले होईल
  • जेव्हा सगळे  प्राणत्याग कराल तेव्हा खोलीत हलकासा प्रकाश हवा
  • हातांना बांधायचे कापड शिल्लक राहिले तर डोळ्यांवर पट्टी बांधा. शिवाय तोंड देखील पट्टीने बांधा
  • रात्री १२ ते १ मध्ये प्राण त्याग करायला हवा त्याआधी होम पूर्ण व्हायला हवे

५ जणांचे पोस्टमार्टम रिपोर्ट

मृतदेह काढल्यानंतर तातडीने या सगळ्यांचे मृतदेह पोस्टमार्टम रिपोर्टसाठी पाठवण्यात आले. ज्यातील ६ लोकांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला असून त्यात काहींच्या शरीरावर जबरदस्तीच्या खूणा आहेत. यात लहानमुलांचा समावेश आहे. ध्रुव, शिवम, नीतू, मोनू  अशी या मुलांची नावे असून  त्यांना फासावर लटकवताना जबरदस्ती केली असावी असे रिपोर्टमधून समोर आले आहे.

प्रियांकाचा झाला होता साखरपुडा

मृतांमध्ये प्रियांका नावाच्या मुलीचा समावेश असून तिचा १७ जून रोजी साखरपूडा झाला होता. नोव्हेंबरला तिचे लग्न होते. ती एका आयटी फर्ममध्ये कामाला होतील. मरणाच्या आदल्या दिवशीच तिने आपल्या नातेवाईकांशी लग्नाविषयी चर्चा केली होती. त्यावेळी ती असे काही करेल असे वाटले देखील नव्हते. असे तिच्या नातेवाईकाने सांगितले. शिवाय या साखरपूड्यातील एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. ज्यात प्रियांकासोबत तिचे लहान भाऊ नाचताना दिसत आहेत.

- Advertisement -

 भिंतीवर ११ पाईपची विक्षिप्त रचना

पोलिसांना तपासात नव्याने काही गोष्टी हाती लागत आहेत. यामध्ये घरांच्या भिंतीवर पाईपचे तब्बल ११ आऊटलेट दिसत आहेत. नेमके या मागेही काहीतरी अंधश्रद्धा असण्याची शक्यता आहे. पण हे सगळं कोणाच्या सांगण्यावरुन केले जात आहे. त्या बाबाच्या नावाचा उल्लेख कुठेही केला गेलेला नाही.

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -