Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशViral Video : 'छावा' बघताच बुरहाणपूरमध्ये औरंगजेबाचा खजिना शोधण्यासाठी नागरिकांचं खोदकाम

Viral Video : ‘छावा’ बघताच बुरहाणपूरमध्ये औरंगजेबाचा खजिना शोधण्यासाठी नागरिकांचं खोदकाम

Subscribe

मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र, स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या शौर्याचा धगधगता इतिहास सांगणारा 'छावा' चित्रपट सध्या देशभरात गाजतो आहे. अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ या हिंदी चित्रपटाने अख्ख्या जगाचं लक्ष भारतीय चित्रपटसृष्टीकडे वेधून घेतलं आहे.राजकारण्यांसह विविध स्तरांवरून 'छावा' चित्रपटाचं कौतुक केलं जातं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर अनेक जण भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. पण या चित्रपटानंतर बुरहाणपूरच्या असीरगड येथे एक अजब प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

Burhanpur Gold Coins : मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र, स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या शौर्याचा धगधगता इतिहास सांगणारा ‘छावा’ चित्रपट सध्या देशभरात गाजतो आहे. अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ या हिंदी चित्रपटाने अख्ख्या जगाचं लक्ष भारतीय चित्रपटसृष्टीकडे वेधून घेतलं आहे.राजकारण्यांसह विविध स्तरांवरून ‘छावा’ चित्रपटाचं कौतुक केलं जातं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर अनेक जण भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. पण या चित्रपटानंतर बुरहाणपूरच्या असीरगड येथे एक अजब प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यानुसार, या शहरात औरंगजेबाचा खजिना लपवलेला असल्याचे चित्रपटात दाखविण्यात आले होते. चित्रपटातील हा प्रसंग आणि असीरगड येथे उठलेली अफवा यामुळे लोकांनी शेतात धाव घेत सोन्याची नाणी शोधण्याचा प्रयत्न केला. (Burhanpur Asirgarh Fort Mughal era gold coins villagers are seen digging in fields adjoining)

नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीराजेंनी मुघलांचे व्यापारी केंद्र असलेल्या बुऱ्हानपूरवर आक्रमण केलं. त्याचबरोबर औरंगजेबाचा दख्खनमध्ये विस्तारही रोखण्याचा प्रयत्न केला. ‘छावा’ चित्रपटात या संघर्षांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.
चित्रपटातील याच दृश्यानंतर बुरहाणपूरच्या असीरगड येथील गावकरी डोक्याला टॉर्चवाले हेल्मेट, मोबाइलचा टॉर्च सुरू करून रात्रीच्या अंधारात माती चाळताना दिसत आहेत. असीरगड येथील गावात शेतात सोन्याची नाणी आढळल्याची अफवा पसरल्यानंतर ही नाणी शोधण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सर्वांनाच बुरहाणपूर हे औरंगजेबाचे प्रिय शहर असल्याचे कळले. या शहरात त्याचा खजिना लपवलेला असल्याचे चित्रपटात दाखविण्यात आले होते. चित्रपटातील हा प्रसंग आणि असीरगड येथे उठलेली अफवा यामुळे लोकांनी शेतात धाव घेत सोन्याची नाणी शोधण्याचा प्रयत्न केला.

असीरगड येथे महामार्गाची उभारणी करण्यासाठी काम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतात खोदकाम झाले आहे. काही दिवसांपूर्वी मजूरांनी याठिकाणी मातीत सोन्याचे शिक्के मिळाल्याचे सांगितले. यानंतर असीरगडच्या गावाता अफवा पसरली की, याठिकाणी औरंगजेबाचा खजाना पुरलेला आहे. यामुळे आजूबाजूच्या गावांतूनही ग्रामस्थ याठिकाणी धडकले आणि त्यांनी चाळणीने माती चाळायला सुरूवात केली. रात्रंदिवस याठिकाणी लोक माती चाळण्याचे काम करत आहेत.

या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये गावकऱ्यांनी टॉर्च असलेल्या टोप्या, मेटल डिटेक्टर असे साहित्य जमवून सोन्याची नाणी शोधण्याचा चंग बांधलेला दिसतो. दरम्यान, व्हायरल व्हिडीओनंतर पोलिसांनी महामार्गालगत खड्डे खणणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. अनधिकृतपणे खोदकाम केल्यास कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.


हेही वाचा – Womens Day 2025 : महोदया आम्हाला खून करण्याची परवानगी द्या; रोहिणी खडसेंची राष्ट्रपतींकडे मागणी