घरताज्या घडामोडीJammu bus Accident : जम्मू-श्रीनगर महामार्गावर बसचा अपघात, 7 जणांचा मृत्यू

Jammu bus Accident : जम्मू-श्रीनगर महामार्गावर बसचा अपघात, 7 जणांचा मृत्यू

Subscribe

जम्मू-श्रीनगर महामार्गावर (Jammu-Srinagar highway bus accident) बसचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना (Police) मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली आणि बचावकार्याला (rescue operations) सुरूवात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसरवरून (Amritsar) येणारी बस दरीत कोसळ्याने जम्मू-काश्मीरमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. बस पुलावरून कोसळल्याने ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच ही घटना जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील जज्जर कोटली भागाजवळील रियासी जिल्ह्यात घडली. कटरा येथून हे अंतर 15 किमीपर्यंत आहे. बसचं नियंत्रण गेल्यामुळे ही मोठी घटना घडली. 41 जण जखमी झाले असून त्यांना जवळली रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींची ओळख ही अद्यापही पटलेली नाहीये.

- Advertisement -

नेमका अपघात कसा घडला?

बसमध्ये 50 हून अधिक प्रवासी होते. बस राष्ट्रीय महामार्ग 44 वरील जज्जर कोटलीजवळ येताच बसचे नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. या अपघातात 7हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 41 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कटरा येथे जात असलेल्या बसमध्ये बिहारचे लोक होते, असे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

बीएसएफ जवानांना घेऊन जाणारे वाहन दरीत

यापूर्वी ८ मे रोजी जम्मू-कश्मीरमध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली होती. पुंछ जिल्ह्यातील मनकोट सेक्टरमध्ये बीएसएफ जवानांना घेऊन जाणारे वाहन दरीत कोसळले होते. या दुर्घटनेत एक जवान शहीद झाला होता. तर सहा जण गंभीर जखमी झाले होते. लष्कराचे वाहन अनियंत्रित होऊन 250 फूट खोल दरीमध्ये कोसळले होते. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी खोल दरीमध्ये उतरून जखमी जवानांना बाहेर काढले होते.

अशा घटना काय घडतायत?

जम्मू कश्मीरमध्ये डोंगराळ आणि पर्वतीय भागातून रस्तेवाहतूक होत असल्याने अपघाताच्या घटना अनेकदा घडत असतात. विशेषत: बस दरीत कोसळणे, दरड कोसळून रस्ते खचने आणि वाहने रस्त्यावरच मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकणे असे प्रकार घडत असतात.


हेही वाचा : कर्नाटकातील म्हैसूरजवळ भीषण अपघात; बस आणि इनोव्हा कारची धडक, 10 ठार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -