Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Bus Accident : भाविकाना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू...

Bus Accident : भाविकाना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू तर 28 गंभीर जखमी

Subscribe

उत्तराखंडमध्ये रविवारी एक मोठा बस बस अपघात झाल्याची दुर्घटना घडली. गंगोत्री महामार्गावर गंगनानीजवळ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली.

उत्तराखंड : भाविकांना घेऊन जाणारी एक बस गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावरील गंगनानी येथे 50 मीटर खोल दरीत जाऊन कोसळली. यामध्ये एकुण 35 भाविक प्रवासी होते. त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला असून, 28 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पुढेल आली आहे. ही बस गुजरातमधील भाविकांना गंगोत्रीकडे घेऊन जात होती.

उत्तराखंडमध्ये रविवारी एक मोठा बस बस अपघात झाल्याची दुर्घटना घडली. गंगोत्री महामार्गावर गंगनानीजवळ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. तेथे 28 जखमींना उत्तरकाशीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी सात गंभीर जखमी प्रवाशांना एम्स ऋषिकेश आणि दून हॉस्पिटल डेहराडूनमध्ये पाठवण्यात आले आहे.

- Advertisement -

गुजरातच्या भाविक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बस क्रमांक (युके- 07-8585) 35 प्रवाशांसह गंगोत्रीहून उत्तरकाशीच्या दिशेने येत होती. यादरम्यान बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती 50 मीटर खोल दरीत जाऊन कोसळली. अपघाताची माहिती मिळताच मणेरी पोलीस ठाणे, एसडीआरएफ आणि एनडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. काही वेळात डीएम अभिषेक रुहेला आणि एसपी अर्पण यदुवंशीही घटनास्थळी पोहोचले. सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या बचावकार्यात 28 जखमींना खड्ड्यातून बाहेर काढून रस्त्यावर आणण्यात आले.

सात जणांचा मृत्यू

- Advertisement -

अपघातातील जखमींना 108 सेवा आणि रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सात गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. एसपी अर्पण यदुवंशी यांनी सांगितले की, बसमध्ये यात्रेकरू आणि ड्रायव्हर आणि हेल्परसह एकूण 35 लोक होते. सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

हेही वाचा :ED म्हणजे भाजपचं इलेक्शन डिपार्टमेंट; अजित पवारांच्या बंडखोरीवर कन्हैया कुमारांचा हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख

या घटनेवर मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी दु:ख व्यक्त करत जखमी लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. तर या घटनेची जिल्हाधिकारी पातळीवर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोबतच राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग (सेनी) यांनी उत्तरकाशी जिल्ह्यातील वाहन अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, अशी प्रार्थना करताना त्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या. राज्यपालांनी या दुर्घटनेतील जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्याच्या कामना केल्या आहेत.

हेही वाचा : Vande Bharat Express: भगव्या रंगातील वंदे भारत एक्स्प्रेस पाहिली का?

यापूर्वीही झालेले आहेत अपघात

गंगोत्री महामार्गावर यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. उत्तरकाशी. उत्तरकाशीमध्ये यापूर्वीही मोठे अपघात झाले आहेत. 1995 मध्ये झालेल्या बस अपघातात 70 तर 2017 मध्ये झालेल्या बस अपघातात 30 जणांचा बळी गेला होता. जिल्ह्यातील डबराणी, गंगनानी, नळूपाणी या गावांचा अपघातांच्या बाबतीत काळा इतिहास आहे.

- Advertisment -