घरदेश-विदेशकेरळमध्ये बस-कारची समोरासमोर धडक, अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद

केरळमध्ये बस-कारची समोरासमोर धडक, अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद

Subscribe

केरळ : केरळ मधील पथानमथिट्टा जिल्ह्यातील किझावल्लोरजवळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसची आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या घटनेत कारचा चक्काचूर झाला असून बस शेजारील कमानीला धडकून चर्चमध्ये घुसली. केरळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसने कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कारला धडक दिली आहे.


बस आणि कारची धडक इतकी जोरदार होती दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. भरधाव बसने कारला धडक दिल्यानंतर रोडच्या शेजारील चर्चच्या कमानीला धडक दिली आणि चर्चची भिंत तोडून बस चर्चमध्ये घुसली. ही घटना शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -