Tuesday, March 2, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी प्रवाशांची बस ३० फूट खोल दरीत कोसळली; बचावकार्य सुरु

प्रवाशांची बस ३० फूट खोल दरीत कोसळली; बचावकार्य सुरु

मध्य प्रदेशमध्ये ५४ प्रवाशांनी भरलेली बस तब्बल ३० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे.

Related Story

- Advertisement -

अपघातांचे सत्र सुरु असतानाच मध्य प्रदेशमध्ये बसला भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. ५४ प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात कोसळून हा अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात होऊन बस तब्बल ३० फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, सात प्रवशांना वाचवण्यात यश आले असून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

असा घडला अपघात

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार; मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास बस सतनाच्या दिशेने जात होती. त्याच दरम्यान, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस ३० फूट खोल दरीत कोसळली. कालवा खोल असल्याने बसला सध्या क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. यातील ११ प्रवासी कालव्यात बुडाले असून त्यातील ७ जण पोहत बाहेर आले आहेत. त्यांना वाचवण्यात यश आले असून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, बसमधून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु असताना अडथळे येत असल्याने बाणसागर धरणातून होणारा विसर्गही थांबवण्यात आला आहे.


हेही वाचा – धक्कादायक! गाडलेल्या महिलेचा मृतदेह आला कब्रस्तानातून बाहेर आणि…


- Advertisement -

 

- Advertisement -