घर देश-विदेश अनिल अंबानींना आयकर विभागाची नोटीस; 814 कोटींचा करचुकवेगिरी केल्याचा आरोप

अनिल अंबानींना आयकर विभागाची नोटीस; 814 कोटींचा करचुकवेगिरी केल्याचा आरोप

Subscribe

देशातील प्रसिद्ध उद्योगमंत्री अनिल अंबानी यांच्या समोरील अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीत. अनिल अंबानी यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. तब्बल 814 कोटी रुपयांची माहिती लपवल्याचा ठपका त्यांच्याविरोधात ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात आयकर विभागाने नोटीस जारी केली असून त्यात या रकमेवरील कर चुकवल्याचा ठपका ठेवला आहे. मात्र याबाबत अनिल अंबानी यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

भारतात सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी टॉपला असलेले उद्योजक मुकेश अंबानी यांचे अनिल अंबानी भाऊ आहेत. त्यामुळे त्यांना इनकम टॅक्सनी पाठवलेली नोटीस आता चर्चेचा विषय ठरली आहे. या प्रकरणात आता अनिल अंबानींविरोधात काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

काय नेमका आरोप?

- Advertisement -

अनिल अंबानी यांनी 2012 – 13 ते 2019-20 पर्यंत परदेशात ठेवलेल्या अघोषित मालमत्तेवर जाणिवपूर्वक कर चुकविल्याचा आरोप आयकर विभागाकडून करण्यात आला आहे. दरम्यान आयकराने अनिल अंबानी यांना नोटीसीला 31 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याची मुदत दिली आहे. दरम्यान ही रक्कम काळा पैसा असल्याचा ठपका ठेवत त्यांविरोधात खटला चालवला जाण्याची शक्यता नाकरता येत नाही, तसेच या प्रकरणात ते दोषी आढळल्यास 2015 मधील काळा पैसा (अघोषित परकीय उत्पन्न आणि मालमत्ता) इम्पोझिशन ऑफ टॅक्स कायद्या अंतर्गत कलम 50 आणि 51 अन्वये त्यांना दंडासह 10 वर्षांची शिक्षा देखील होऊ शकते.

आयकराने नोटीसमध्ये काय म्हटलं?

अनिल अंबानी बहामास स्थित इकाई डायमंड ट्रस्ट आणि नॉर्दर्न एटलांटिक ट्रेडिंग अनलिमिटेड या कंपनीतील आर्थिक भागीदार आहेत. या कंपनीची मिळकत आणि मालमत्ता ही त्यांच्या नावे असल्याचा आयकर विभागाला संशय आहे. त्यामुळे अनिल अंबानी यांनी काळ्या पैशांविरोधातील कायद्यानुसार 420 कोटी रुपयांचा कर चुकवल्याचा नोटीसीत म्हटलंय. 814 कोटी पेक्षा अधिक रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेवरुन आता अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


मराठा आरक्षण निवडसूचीतील 1 हजार 64 उमेदवारांची तात्काळ नियुक्ती; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

- Advertisement -
- Advertisement -
sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -