Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुकेश अंबानींच्या व्हायरल फोटोमध्ये दिसणारे बाबा कोण? बाबा आणि मुलाचं आहे खास...

मुकेश अंबानींच्या व्हायरल फोटोमध्ये दिसणारे बाबा कोण? बाबा आणि मुलाचं आहे खास नातं

Subscribe

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबांचे राजस्थासोबत असलेले संबंध कोणापासूनही लपलेले नाहीत. राजस्थानमध्ये त्यांची ये-जा सुरू असते. काल सोमवारीच मुकेश अंबानी सहकुटुंबासह राजस्थानला पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा शहरातील श्रीनाथजी मंदिराला भेट दिली. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांची पत्नी आणि मुकेश अंबानींची होणारी सून राधिका मर्चंट, श्रीनाथ मंदिराचे बाबा यांच्यासोबत दिसत आहेत. हे चित्र समोर आल्यानंतर लोकं या बाबांबद्दल जाणून घेण्यात व्यस्त झाले आहेत.

- Advertisement -

कोण आहेत हे बाबा?

- Advertisement -

वास्तविक हे बाबा श्रीनाथ मंदिराचे महंत आणि मुकेश अंबानी कुटुंबातील तिलकायत महाराज यांचे पुत्र आहेत. मुकेश अंबानी काल 5G लॉन्च आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नवीन प्रकल्पासाठी देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे पोहोचले होते. यावेळी त्यांनी अनंत अंबानी यांच्या जीवनातील यशासाठी बाबांचे मार्गदर्शन घेतले.

अंबानी कुटुंबातील धीरुभाई अंबानी आणि कोकिलाबेन अंबानी यांचा श्रीनाथजींवर विश्वास होता. आता मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचीही श्रीनाथजींवर खूप श्रद्धा आहे आणि पिढ्यानपिढ्या, आता अनंत अंबानींचा विश्वासही या दिशेने मार्गस्थ केला जात आहे. मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत, अनंतची पत्नी राधिका मर्चंट आणि कंपनीचे संचालक मनोज मोदी यांनी मार्ग आणि धर्माचे पालन कसे करावे याविषयी मार्गदर्शनासाठी बाबांशी संपर्क साधला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांनी नाथद्वारातून त्यांचा नवीन प्रोजेक्ट 5G स्पेक्ट्रम लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे येथे प्रथम 5G लाँच केले जाणार आहे. यानंतर रिलायन्स सर्व देशभरातील ग्राहकांना ही सुविधा देणार आहे.


हेही वाचा : ‘सिंहीण अचानक पार्टीत आणि…’, जीव वाचवण्यासाठी माणूस थेट चढला झाडावर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -