घरताज्या घडामोडीयुरोप ते दक्षिण कोरिया; कोरोना व्हायरल करणारा व्यावसायिक सापडला

युरोप ते दक्षिण कोरिया; कोरोना व्हायरल करणारा व्यावसायिक सापडला

Subscribe

चार देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरवणारा रुग्ण अखेर लंडन येथे सापडला.

जीवघेना कोरोना व्हायरस हा फक्त चीनमध्येच आहे, असे नाही. तर या व्हायरसची व्याप्ती हळुहळु जगभर पसरायला सुरुवात झाली आहे. युरोपमध्ये कोरोना व्हायरस चुकून पसरवणाऱ्या एका रुग्णाचा शोध गेल्या काही दिवसांपासून घेतला जात होता. अखेर हा रुग्ण लंडन येथील हॉस्पिटलमध्ये सापडला आहे. स्टिव्ह वॉल्श (वय ५३) असे या रुग्णाचे नाव असून मलेशिया, दक्षिण कोरिया, फ्रांस आणि स्पेन या देशांमध्ये स्टिव्हमुळे कोरोना व्हायरस पसरला, असा आरोप होत आहे. सध्या स्टिव्ह वॉल्श हे कोरोना संक्रमणापासून मुक्त झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. स्टिव्ह वॉल्श यांना आता सुपर स्प्रेडर या नावाने ओळखले जात आहे.

त्याचे झाले असे की, जानेवारी महिन्यात सिंगापूर येथे ग्रँड हयात हॉटेलमध्ये एक परिषद आयोजित करण्यात आली होती. स्टिव्ह ब्रिटनच्या गॅस अॅनालिटिक्स कंपनी सर्वोमॅक्सचे प्रतिनिधी म्हणून या परिषदेला हजर राहिले होते. तिथेच त्यांना कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचे निदर्शनास आले. हॉटेलमधील या परिषदेला १०९ सदस्य उपस्थित होते. त्यांच्यातील अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आधी हा व्हायरल चीनमधील सदस्यांमुळे व्हारल झाला, अशी अटकळ बांधण्यात आली होती. मात्र सर्वोमॅक्स कंपनीने चीनी सदस्यांच्या चाचण्यात चीनींना कोरोना नसल्याचे सांगितले. त्यानंतर स्टिव्ह वॉल्श यांच्याकडून कोरोना पसरला असल्याचे सर्वोमॅक्सने जाहीर केले. सर्वोमॅक्सच्या कॉन्फरन्सनंतर दक्षिण कोरिया, मलेशिया येथील नागरिकांना कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचे समजले. या दोन्ही देशातील प्रतिनिधी सिंगापूर येतील परिषदेला उपस्थित होते. तर युरोपमधील काही नागरिकांनाही कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले.

- Advertisement -

तो भटकंती करत करत व्हायरस पसरवत गेला

सिंगापूर येथील कॉन्फरन्स संपवून स्टिव्ह आपल्या पत्नीसोबत फ्रान्स येथे फिरायला गेला होता. तिथे ब्रिटनमधील त्यांच्या चार मित्रांशी त्यांचा संबंध आल्यामुळे या चारही जणांना कोरोनाची लागण झाली. पत्नीसोबत सुट्टी एन्जॉय करत असताना स्टिव्ह यांनी जेट स्कीचा आनंद लुटला. त्यावेळी देखील ब्रिटनमधील आणखी पाच लोकांना कोरोनाने संक्रमित केले. तसेच एका स्पॅनिश नागरिकाला देखील कोरोनाची बाधा झाली होती. एकूण ११ लोकांना स्विव्ह वॉल्श यांच्यामुळे कोरोनाची लागण झाल्याचे आता समोर आले आहे.

६ फेब्रुवारी रोजी स्विव्ह पुन्हा आपल्या घरी ब्रिटनमध्ये पोहोचले होते. त्यानंतर त्यांना आपण कोरोना बाधित असल्याचे समजले. सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना स्टिव्ह यांनी सांगितले की, “मी एनएचएसचे आभार व्यक्त करतो. त्यांनी माझी काळजी घेतली, मला मदत केली. आता मी धोक्यातून बाहेर आहे. मात्र माझ्यामुळे ज्यांना कोरोनाची लागण झाली त्याबद्दल मला काळजी वाटत आहे.”

- Advertisement -

कोरोना व्हायरस ज्याला आता कोविड १९ (Covid 19) म्हटले जाते, त्याने एकट्या चीनमध्ये १ हजार ६८ लोकांचे बळी घेतले आहेत. तर चीनमध्ये ४३ हजार लोकांना व्हायरसची लागण झाली आहे. तर इतर २४ देशांमध्ये कोरोना पसरला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -