घरअर्थजगतदिवाळीच्या आधीच खरेदी करा सोनं; या कारणांमुळे वाढणार आहे सोन्याचा भाव

दिवाळीच्या आधीच खरेदी करा सोनं; या कारणांमुळे वाढणार आहे सोन्याचा भाव

Subscribe

भारतात प्रत्येक सणाला सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र, सध्याच्या घडीला गुंतवणूकीसाठी सोनं खरेदी केलं जात आहे. दरम्यान, आता सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली. मधल्या काळाता काही प्रमाणात सोन्याचे भाव कमी झाले होते. १० ग्रॅम सोन्याचा दर ४९ हजार ९३० रुपये आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी दिवाळीपूर्वी सोन्यात गुतवणूक करावी की सोनं कमी होण्याची वाट पाहावी, असा प्रश्न उद्भवत आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की सोनं खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे, कारण दिवाळीच्या काळात सोन्याचा भाव वाढणार आहेत. शिवाय काही कारणांमुळे सोन्याचा भाव वाढणार आहे.

अमेरिकन राष्ट्रपती पदाची निवडणूक

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीला आता अवघ्या १५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे, त्या मुळे सोन्याच्या किंमतीत चढ-उतार होताना दिसून येत आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेचा संपूर्ण जगावर होणारा परिणाम होतो. अशा परिस्थितीत निवडणुकांमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे लोकही सोन्याकडे आकर्षित होत आहेत.

- Advertisement -

केडिया कमोडिटीचे संचालक अजय केडिया यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेतील पुढचे राष्ट्रपती कोण यावर सोन्याच्या किंमती अवलंबून असतील. अमेरिकेत अध्यक्षपदाची शर्यत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बिडेन यांच्यात आहे. जर जो बिडेन राष्ट्राध्यक्ष झाले तर सोन्याचे दर उंचावतील.

कोरोनाने सोन्याचे दर वाढले

कोरोनाचे वाढते प्रमाण आणि पॅरिस-लंडनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनमुळे जगभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे लोक सोन्याकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहात आहेत आणि सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे सोन्याचे दर वाढत आहेत.

- Advertisement -

डिजिटल गोल्डने सोन्याच्या किंमतीही वाढवल्या

आता सोन्यातील गुंतवणूकीवरील असुरक्षितता संपुष्टात आली आहे, त्यामुळे त्यामध्ये गुंतवणूक वेगाने वाढत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे डिजिटल गोल्ड. पूर्वी, भौतिक स्वरुपात सोने विकत घेण्यामुळे त्याच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाटत असे, परंतु आता सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी फिजिकल गोल्ड विकत घेण्याची आवश्यकता नाही. यामुळे सोन्यातील गुंतवणूक आकर्षक बनली आहे.

दिवाळीपर्यंत सोने ५३-५४ हजारांपर्यंत पोहोचू शकते

उत्सवांमध्ये सोन्याचा वापर वाढतो. दिवाळीपूर्वी धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. धनत्रयोदशीच्या निमित्त सोन्याची मोठी खरेदी केली जाते. ब्रोक्रेज फर्म अँजेल ब्रोकिंगच्या वस्तू व चलनांच्या संशोधनाचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार दिवाळीपर्यंत सोने ५३-५४ हजारांपर्यंत पोहोचू शकते.


हेही वाचा – खुशखबर! ही कंपनी देतेय स्वस्त कर्जासोबत ८ लाख रुपयांपर्यतचं गिफ्ट व्हाउचर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -