Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश इंस्टाग्रामवर बाळाचा व्हिडीओ टाकून सीमा म्हणाली- हमेशा खुश रहो, वाचा काय आहे...

इंस्टाग्रामवर बाळाचा व्हिडीओ टाकून सीमा म्हणाली- हमेशा खुश रहो, वाचा काय आहे सत्यता

Subscribe

पब्जीच्या (PUBG) माध्यमातून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि सचिन यांची प्रेमकहाणी बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.

नवी दिल्ली : पब्जीच्या गेमच्या माध्यमातून भारतात आलेल्या सीमा आणि सचिनची प्रेम कहानी काही दिवसांपासून चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान सीमा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काहीना काही पोस्ट करीत असते. दरम्यान तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका नवजात बाळाचा व्हिडीओ टाकून हमेशा खुश रहो असे लिहल्यानंतर युजर्सनी तिलाच आई बनण्याच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, यामागील सत्य जरा वेगळेच आहे. (By putting a video on Instagram Seema said Always be happy Vacha kya aahe satya in marathi)

पब्जीच्या (PUBG) माध्यमातून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि सचिन यांची प्रेमकहाणी बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. सीमा हैदर सोशल मीडिया अकाउंटवर सतत व्हिडिओ शेअर करत असते. दरम्यान, सीमा हैदर गरोदर असल्याची चर्चा होती. मात्र, यातील सत्यता अद्याप पुढे आली नाही.

सीमा हैदर गरोदर?

- Advertisement -

सीमा हैदर सचिनच्या मुलाची आई होणार असल्याची अफवा मागील काही दिवसांपासून चांगलीच व्हायरल झाली आहे. सचिनने सीमा हैदरलाही काही वेळा वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले. मात्र, सीमाने तिच्या गरोदरपणाच्या वृत्तावर स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. तिच्या गरोदरपणावर बोलताना सीमा म्हणाली की ही वैयक्तिक बाब आहे.

हेही वाचा : राजू शेट्टी गहिवरले; ऊस उत्पादकाच्या मुलांचा दैदीप्यमान प्रवास पाहून म्हणाले-खर्च केलेले तरुणपण…

सीमाने इंस्टाग्रामवरील त्या व्हिडीओमध्ये काय?

- Advertisement -

सीमा हैदरच्या गरोदरपणाच्या बातम्यांदरम्यान पाकिस्तानातून एक बातमी समोर आली आहे. सीमा हैदरने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने आनंद व्यक्त केला आहे. सीमाने इन्स्टाग्रामवर नवजात बाळाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पोस्टनुसार, सीमा हैदरही त्या बाळाची नात्याने मावशी आहे म्हणजेच तिच्या बहिणीला बाळ झाले आहे.

हेही वाचा : Chandrayaan-3: चांद्रयान- ३ चा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, वाचा पूर्ण टाइमलाइन; 23 ऑगस्ट चंद्रावर होणार लँड

युजर्सनी सीमाचेच केले अभिनंदन

इन्स्टाग्रामवर नवजात बालकाची पोस्ट करत सीमाने त्याला “नेहमी आनंदी राहा” असे कॅप्शन दिले आहे. सीमाच्या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंटही केल्या. अनेक जण सीमाचे अभिनंदनही करत आहेत. सीमा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सतत पोस्ट करत असते. ती कधी पती सचिनसोबत फोटो शेअर करते तर कधी हिंदी गाण्यांवर रील पोस्ट करते.

- Advertisment -