घरताज्या घडामोडीC-17 ग्लोबमास्टर विमान अफगाणिस्तानहून भारतात दाखल,१६८ भारतीयांची सुटका

C-17 ग्लोबमास्टर विमान अफगाणिस्तानहून भारतात दाखल,१६८ भारतीयांची सुटका

Subscribe

आतापर्यंत अफगाणिस्तामध्ये अडकलेल्या ३५०-४०० भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यात आले आहे. असे असले तरी ८०० ते ९०० भारतीय नागरिक अफगाणिस्तानमध्ये अडकले आहेत.

अफगाणिस्तानमध्ये (Afganistan) अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारचे अथक प्रयत्न सुरू आहेत. ‘वंदे भारत’ (Vande Bharat) या मोहिमेतंर्गत अफगाणिस्तामधील भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यात येत असून C-17 ग्लोबमास्टर विमान (C-17 Globemaster aircraft) आज रविवारी अफगाणिस्तानहून भारतात दाखल झाले आहे. (C-17 Globemaster aircraft arrives in India from Afghanistan)  अफगाणिस्तामधून १६८ भारतीयांना घेऊन या विमानाने उड्डाण केले. आज हे विमान गाझियाबादच्या हिंडोन विमानतळात दाखल झाले आहे. सरकारच्या वंदे भारत मोहिमेला वेग अला असून १६८ भारतीयांची अफगाणिस्तानधून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. हे भारतीय नागरिक विमानतळावर पोहचताच त्यांची RT-PCR चाचणी करण्यात आली.

- Advertisement -

काबुल विमानतळावरुन दररोज दोन विमानांना उड्डाण करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. त्यानुसार आत C-17 हे विमान भारतात दाखल झाले आहे. सध्या काबूल विमानतळावर अमेरिकी सुरक्षा यंत्रणा तैनात आहे. तिथून भारतासाठी रोज निदान २ विमानांच्या उड्डांना परवानगी देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी भारताला ही परवानगी मिळाली. आतापर्यंत अफगाणिस्तामध्ये अडकलेल्या ३५०-४०० भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यात आले आहे. असे असले तरी ८०० ते ९०० भारतीय नागरिक अफगाणिस्तानमध्ये अडकले आहेत.

- Advertisement -

साधारण: पुढच्या पाच ते सहा दिवसात अफगाणिस्तामध्ये अडकलेल्या नागरिकांना भारतात आणायचे आहे. अफगाणिस्तामध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुपपणे भारतात कसे आणता येईल ही सध्या भारतासमोर असलेली सर्वांत मोठी प्राथमिकता आहे. भारताला विमान उड्डणासाठी आणखी संधी मिळाली तर येत्या २-३ दिवसात अफगाणिस्तामधील भारतीयांना बाहेर काढणे सोपे होईल यासंबंधी भारताची सध्या अमेरिकेसह चर्चा सुरू आहे,अशी माहिती आंतरराष्ट्रीय घडामोडी अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी टिव्ही९ शी बोलताना दिली.

अफगाणिस्तामधील हमित कर्जाई आंतरराष्ट्रीय विमानतळाची जबाबदारी अमेरिकन फौजाकडे आहे. ३१ ऑगस्टपर्यंत या फौजा विमानतळात राहणार आहेत. गरज पडल्यास या फौजा ३१ ऑगस्टनंतर देखील तैनात असतील. तर ३१ ऑगस्टनंतर विदेशी फौजा त्या ठिकाणी थांबल्यास त्यांच्यावर कारवाई करू असे तालिबानकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टनंतर तालिबानची काय भूमिका असणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – तालिबान्यांमध्ये २० वर्षानंतरही काहीच बदल नाही, कंदाहर अपहर घटनेचे साक्षीदार कॅप्टन देवी शरण यांचा अनुभव

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -