घरदेश-विदेशटाटा एअरबस प्रकल्पावरून महाराष्ट्रात राजकीय खडाजंगी; गुजरातमध्ये मात्र भूमिपूजनाचा आनंद

टाटा एअरबस प्रकल्पावरून महाराष्ट्रात राजकीय खडाजंगी; गुजरातमध्ये मात्र भूमिपूजनाचा आनंद

Subscribe

महाराष्ट्रातील प्रस्तावित टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येत काही ठोस पाऊल उचललेले नाही. मात्र यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टाटा एअरबस प्रकल्पाचा भूमीपूजन सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज दुपारी 2.30 वाजता बडोद्यात टाटा एअरबस प्रकल्पाची पायाभरणी केली जाईल, त्यामुळे लाखो रोजगार आणि हजारो कोटींची गुंतवणूक असलेला टाटा एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. यावरून राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडीचे नेते परस्परांवर राजकीय चिखलफेक करत असल्याचे चित्र दिसतेय.

येत्या काही दिवसांत गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे गुजरात दौरे वाढत आहेत. महाराष्ट्रातील प्रकल्प ज्याप्रमाणे गुजरातमध्ये जात आहेत, त्याप्रमाणे राज्यातील भाजप नेतेही गुजरातमध्ये जाण्याची शक्यता आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील काही नेत्यांवर खास जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे नेते महाराष्ट्र गुजरात सीमेवरील जिल्ह्यांमध्ये जाऊ भाजपच्या प्रचार सभेत सहभागी होणार आहेत. केंद्रीय नेतृत्त्वाने महारष्ट्रातील भाजप नेत्यांना तशा सुचनाही दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधीच गुजरातमध्ये तीन मोठ्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये दांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रगपार्क आणि टाटा-एअरबस या प्रकल्पांचा समावेश आहे. हे तिन्ही प्रकल्प महाराष्ट्रात प्रस्तावित होते. मात्र ऐनवेळी चक्र फिरली आणि हे तीनही प्रकल्प गुजरातमध्ये गेले. यामुळे महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मात्र हे सर्व प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुजरातमध्ये गेल्याचे सांगत शिंदे फडणवीस सरकारने हात वर केले आहेत.

- Advertisement -

राज्यात तीन महिन्यांपूर्वी मोठ्या सत्तांतरणानंतर शिंदे- फडणवीस सरकार सत्तेवर आले, या तीन महिन्यात महाराष्ट्रातील तीन मोठे प्रकल्प एकापाठोपाठ एक गुजरातमध्ये गेले, दरम्यान हे तिन्ही प्रकल्प एकाचवेळी गुजरातला का गेले, हा योगायोग म्हणायचा का? अशी विरोधकांनी शंका उपस्थित करत महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला नेण्यासाठीच राज्यात सत्तांतर घडवून आणण्यात आले का, असा सवाल माजी उद्योगमंत्री आणि ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी उपस्थित केला आहे. वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क प्रकल्प आणि टाटा-एअरबस प्रकल्प एकाचवेळी गुजरातमध्ये जाण्याच्या योगायोगाकडे सुभाष देसाई यांनी सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधील वडोदरा येथे लष्करासाठी C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट प्लांटची पायाभरणी करणार आहेत. म्हणजेच देशातील पहिले लष्करी वाहतूक विमान गुजरातमधील या प्लांटमध्ये तयार होणार आहे.

- Advertisement -

देशात प्रथमच खासगी कंपनी विमान बनवणार आहे. टाटा एअरबस या विमानांची निर्मिती करणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. संरक्षण सचिव अरमानी गिरीधर यांच्या म्हणण्यानुसार, 40 विमानांव्यतिरिक्त, टाटा एअरबस देखील हवाई दलाच्या गरजेनुसार आणि वाहतुकीवर आधारित अतिरिक्त विमानांची निर्मिती करेल.


पाकिस्तानात कुराणाचा अपमान; जमावाकडून हल्लाचा प्रयत्न

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -