घरदेश-विदेशलोकसभा निवडणुकांमुळे सीएच्या परीक्षा लांबणीवर...

लोकसभा निवडणुकांमुळे सीएच्या परीक्षा लांबणीवर…

Subscribe

पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी २२, २३ व २४ ,२९ आणि ३० एप्रिल असे पाच दिवस असल्याने. अशा एकूण पाच दिवसांत नियोजित असलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत.

लोकसभा निवडणूकीचा फटका देशभरातील तसेच राज्यातील विद्यार्थांना बसू नये, याकरिता परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय इन्स्टिट्युट ऑफ चार्टड अकाऊंट ऑफ इंडियाकडून घेण्यात आला आहे. ही परिक्षा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार होती. त्या परिक्षेच्या तारखा पुढे ढकलल्या सांगण्यात येत आहे. आता २७मे ते १२ जून दरम्यान परिक्षा घेतल्या जाणार आहेत. यासाठीचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहिर करणार असल्याचे आयसीएआय ने सांगितले.

पाच दिवसांत नियोजित असलेल्या परीक्षा पुढे

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या २३ एप्रिलच्या पहिल्या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे या जिल्ह्यंत व सिल्वासा या केंद्रशासित प्रदेशात मतदान होणार आहे. २९ एप्रिल या दुसऱ्या टप्प्यात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर व रायगड (मावळ) या जिल्ह्यांमध्ये मतदान होईल. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी २२, २३ व २४ एप्रिल असे तीन दिवस तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी २९ व ३० एप्रिल असे पाच दिवस आहेत. अशा एकूण पाच दिवसांत नियोजित असलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत.

- Advertisement -

मुंबई विद्यापीठाच्या परिक्षाही पुढे

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने देखील परिक्षांच्या वेळापत्रकात सोमवारी बदल करत पाच दिवसीय होणाऱ्या परिक्षादेखील पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार, २२ ते २४ आणि २९ ते ३० एप्रिल दरम्यान होणाऱ्या परिक्षा होणार आहे.

निकाल लावण्यास विलंब

दहावी-बारावीच्या परिक्षा मार्चच्या शेवटी संपणार आहे. तसेच, शालेय परिक्षा १२ एप्रिल पर्यंत संपतील. या परिक्षेचे निकाल मे महिन्यात लागतात. मात्र निवडणूकीच्या कामासाठी शिक्षक-प्राध्यापकांची नियुक्ती केल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम नक्कीच होणार आहे. काही शाळांमधील ९०% शिक्षकांना निवडणूक संदर्भातील कामे दिल्याने निकाल वेळेत लावण्यास विलंब होऊ शकतो. मात्र असे असले तरी, दहावी बारावीच्या निकालावर लोकसभेच्या निवडणूकीचा परिणाम होणार नाही. अशी योग्य ती काळजी घेतली असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – लोकसभा निवडणूक सात टप्प्यात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -