नवी दिल्ली : येत्या आठवड्यात देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू होणार आहे, असा दावा केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी केला आहे. पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा येथील काकद्वीप येथील एका जाहीर सभेत शंतनू ठाकूर यांनी सीएएबाबत वक्तव्य केले आहे.
‘येत्या आठवड्यात केवळ पश्चिम बंगालमध्ये नव्हे, तर संपूर्ण देशात सीएए लागू होईल’, असे शंतनू ठाकूर म्हणाले. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा देशाचा कायदा असल्याचा उल्लेख केला होता. या कायद्याची अंमलबजावणी होण्यापासून कोणीही रोख शकत नाही. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सीएएबद्दल दिशाभूल करत आहे, असा आरोपही त्यांनी केला होता.
हेही वाचा – Chhagan Bhujbal : ओबीसींच्या प्रश्नांपुढे मला कुठल्याही पदाची लालसा नाही, जा सांगा त्यांना- भुजबळ
सीएएबाबत ममता बॅनर्जी म्हणाल्या, “पूर्वी नागरिकत्व कार्ड हे जिल्हा दंडाधिकाऱ्यांची जबाबदारी होती. पण आता राजकारणासाठी त्यांच्याकडून हिसकावून घेतले गेले आहे. त्यांना लोकांमध्ये फूट पाडायची आहे. काहींना नागरिकत्व द्यायचे आहे आणि इतरांना ते नाकारायचे आहे. त्यामुळे एकाला नागरिकत्व मिळत असेल, तर दुसऱ्या समुदायाला ते मिळायला हवे, हा भेदभाव चुकीचा आहे.”
हेही वाचा – Raj Thackeray: रेल्वे मंत्रालयाकडून भरतीची जाहिरात; राज ठाकरेंनी ट्वीट करत मनसैनिकांना केलं ‘हे’ आवाहन
सीएए 2019 मध्ये झाला मंजूर
डिसेंबर 2019 मध्ये संसदेने सीएए मंजूर केला होता. हा कायदा मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींनी मंजूर दिली. यानंतर देशातील काही भागांत याविरोधात निदर्शने करण्यात आली होती. या कायद्यानुसार, 31 डिसेंबर 2014 पर्यंत बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारशी यांना भारतीय नागरिकत्व देणारा हा सीएए आहे.