घरताज्या घडामोडी'सीएए' विरोधात दिल्लीत पुन्हा हिंसाचार, पोलीस कर्मचाऱ्यांसह ७ जणांचा मृत्यू

‘सीएए’ विरोधात दिल्लीत पुन्हा हिंसाचार, पोलीस कर्मचाऱ्यांसह ७ जणांचा मृत्यू

Subscribe

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला निषेध व पाठिंबा दिल्यामुळे सोमवारी पूर्वोत्तर दिल्लीत चार ठिकाणी हिंसाचार भडकला. या काळात पोलिस कर्मचाऱ्ंयासह ५ जणांचा मृत्यू झाला

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला निषेध व पाठिंबा दिल्यामुळे सोमवारी पूर्वोत्तर दिल्लीत चार ठिकाणी हिंसाचार भडकला. या काळात पोलिस कर्मचाऱ्यांसह ७ जणांचा मृत्यू झाला. या हिंसाचारात डीसीपी यांच्यासह ५० हून अधिक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जाफराबादमध्ये पेट्रोल पंप, २५ हून अधिक दुकाने, दोन घरे आणि ३५ वाहने जाळली. हिंसाचारादरम्यान चांदबाग परिसरात तैनात पोलिस रतनलाल यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्याचवेळी चांदबाग आणि मुस्तफाबाद येथे दोन नागरिकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी झफराबाद आणि आसपासच्या भागातील अनेक मेट्रो स्टेशनही बंद करण्यात आली आहेत. त्याचबरोबर ईशान्य दिल्लीतील हिंसाचारानंतर खास भागात सुरक्षा दलांना तैनात करण्यात आले आहे.

- Advertisement -

हिंसाचारादरम्यान पोलिसांवर पिस्तुलने गोळीबार करणार्‍या युवकास रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निदर्शने आणि सुधारिक नागरिकत्व कायद्याच्या समर्थन दरम्यान ईशान्य दिल्लीतील काही भागातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्याची विनंती केली आहे.

- Advertisement -

मेट्रो स्थानके बंद 

खबरदारी म्हणून दिल्ली मेट्रोच्या पिंक लाइन सर्व्हिसची पाच मेट्रो स्टेशनही बंद करण्यात आली आहेत. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ट्विट केले की, मौजपूर-बबरपूर, गोकलपूरी, जोहरी एन्क्लेव्ह आणि शिव विहार मोट्रो स्थानके आणि प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -