घरCORONA UPDATEघाबरु नका! आता फक्त २ रुपयात गहू आणि ३ रुपयात तांदूळ मिळणार

घाबरु नका! आता फक्त २ रुपयात गहू आणि ३ रुपयात तांदूळ मिळणार

Subscribe

केंद्र सरकारने देशातील ८० कोटी नागरिकांनादर महिन्याला प्रती व्यक्ती २७ किलो रुपयांचे गहू अवघ्या २ रुपयांना आणि प्रति किलो ३४ रुपये किंमतीचे असणारे तांदूळ फक्त ३ रुपयांत देण्याचा निर्णय घेतला आहे.

करोना विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, घरातून बाहेर न पडल्यास पैसे कसे येणार? पोट कस भरणार असे एकना अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. मात्र, अशा गरिब आणि होतकरु कुटुंबाना सरकारने दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने देशातील ८० कोटी नागरिकांनादर महिन्याला प्रती व्यक्ती २७ किलो रुपयांचे गहू अवघ्या २ रुपयांना आणि प्रति किलो ३४ रुपये किंमतीचे असणारे तांदूळ फक्त ३ रुपयांत देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली आहे.

कंत्राटी कामगारांना संपूर्ण वेतन मिळणार

या मैत्रिमंडळात कंत्राटी कामगारांबाबत देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. कंत्राटी कामगारांनाही संपूर्ण वेतन मिळणार असल्याची घोषणा प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. यावेळी प्रकाश जावडेकर यांनी जनतेला घाबरु नका काळजी घेण्याचे देखील आवाहन केले आहे.

- Advertisement -

लॉकडाऊन आपल्यासाठी, आपल्या कुटुंबियांसाठी

तसंच त्यांनी गुजरातील मधील एका दुकांनाबाहेर मार्किंग केलेल्या ठिकाणी राहून, सुरक्षित अंतर ठेवून वस्तू खरेदी करतानाचा फोटो दाखवला. तसंच ते पुढे म्हणाले की, या दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका. २१ दिवसांचा लॉकडाऊन आपल्यासाठी, आपल्या कुटुंबियांसाठी आहे. त्यामुळे या लॉकडाऊनचे पालन करावे. मोदींनी आपल्या हितासाठी निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

सर्दी, खोकला असेल तर लगेच दवाखान्यात जा. सुरक्षित अंतर ठेवा, असं त्यांनी नागरिकांना आवाहन केलं. तसंच सॅनिटायझरची गरज नाही साबणाने हात धुतले तरी चालतील, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. आतापर्यंत देशात ५६३ करोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ११ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -