घरदेश-विदेशखुशखबर! आता फक्त १३० रुपयांत १५० चॅनेल

खुशखबर! आता फक्त १३० रुपयांत १५० चॅनेल

Subscribe

ग्राहकांना लवकरच आता १३० रुपयांंमध्ये १५० चॅनेल पाहता येणार आहेत.

‘आपल्या आवडीनुसार वाहिन्या निवडा आणि तेवढेच पैसे भरा’ या ’ट्राय’च्या निर्णयानंतर उपलब्ध पर्यायांमुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तर अनेक ग्राहकांना ही सेवा महाग देखील वाटू लागत आहे. दरम्यान, या वाढलेल्या दरांमुळे डीटीएच सेवा घेणाऱ्या ग्राहकांना देखील याचा फटका बसला आहे. याचा विचार करुन आता पुन्हा एकदा पॅकेजमध्ये बदल करण्याचा ऑल इंडिया डिजीटल केबल फेडरेशनने (एआयडीसीएफ) घेतला आहे. या निर्णयामुळे आता ग्राहकांना फक्त १३० रुपयांत दीडशे चॅनेल पाहता येणार आहेत.

…म्हणून घेण्यात आला निर्णय

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नियमानुसार; ग्राहकाला महिन्याला स्थिर आकार भाडे १३० रुपये द्यावे लागते. या पॅकेजमध्ये १०० चॅनेल दिले जातात. मात्र, त्यावरील प्रत्येक चॅनेलसाठी अतिरिक्त पैसे आणि त्यावर सेवाकर आकारण्यात येतात. तसेच प्रत्येक ग्राहकाच्या आवडीवुसार चॅनेलचे वेगवेगळे पैस हे सर्व मिळून केबलसाठी दरमहा ५०० ते १ हजार रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागतात. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळावा याकरता ऑल इंडिया डिजीटल केबल फेडरेशनने (एआयडीसीएफ) नवीन पॅकेज जाहीर केले आहे. या नवीन पॅकेजनुसार ग्राहकांना आता केवळ १३० रुपयांमध्ये १५० टीव्ही चॅनेल पाहायला मिळणार आहेत. त्यानुसार एआयडीसीएफने जाहीर केलेल्या या निर्णयाबाबत राज्यातील केबल ऑपरेटर यांची १६ ऑक्टोबरला बैठक होणार असून चर्चा झाल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई – पुणे महामार्ग उद्या दोन तास बंद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -