३० टक्के लेस शुगर; आता बिनधास्त खा डेअरी मिल्क

cadbury dairy milk chocolate with new version 30 percent less sugar
३० टक्के कमी साखरेची नवी डेअरी मिल्क

आघाडीची चॉकलेट निर्माता कंपनी कॅडबरी डेअरी मिल्कने ३० टक्के कमी साखर असणारे आपले नवे प्रॉडक्ट लाँच केले आहे. मॉडेंलीज इंडियाचे अध्यक्ष दीपक अय्यर यांनी या नव्या प्रॉडक्टबद्दल माहिती दिली. या नव्या प्रकारात अतिरिक्त कृत्रिम गोडवा नसणार, असे अय्यर यांनी सांगितले आहे. त्यामुळे साखरेचा विचार करून जे लोक चॉकलेट टाळत आले होते, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असल्याचे म्हटले जाते.

अय्यर यांनी पुढे सांगितले की, आमची कंपनी ग्राहकांना चांगले उत्पादन देण्यासाठी कटिबद्ध आहे. चॉकलेटची टेस्ट कायम ठेवण्यासाठी आमचे आटोकाट प्रयत्न सुरु असतात. आता येत असलेले नवे उत्पादन देखील टेस्टला कुठेही तडजोड न करता साखर कमी वापरून तयार करण्यात आलेले आहे. हे नवीन चॉकलेट बनविण्यासाठी कंपनीला दोन वर्ष लागले. पुढच्या काही आठवड्यात हे चॉकलेट भारतातील प्रमुख शहरात दाखल होईल. १० रुपये आणि ५० रुपये अशा दोन किमंतीमध्ये हे चॉकलेट उपलब्ध होणार आहे.

मॉडेंलीज कंपनीचे विपणन विभागाचे प्रमुख अनिल विश्वनाथन म्हणाले की, कंपनी चांगल्या टेस्टची उत्पादने देण्यासाठी सदैव तयार असते. आताच्या प्रॉडक्टमध्ये ३० टक्के कमी साखर असली तरी त्यात कोणताही कृत्रिम रंग किंवा इतर वस्तू वापरलेल्या नाहीत.