घरताज्या घडामोडीCanada Accident: रस्ते अपघातात ५ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

Canada Accident: रस्ते अपघातात ५ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

Subscribe

कॅनडामध्ये शनिवारी एका रस्ते अपघातात पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. माहितीनुसार, विद्यार्थी ज्या गाडीने प्रवास करत होते, ती गाडी शनिवारी ओंटारिया राजमार्गावर एका ट्रॅक्टर-ट्रेलरला धडकली. हा एक भीषण अपघात होता. कॅनडामधील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी या घटनेबाबत माहिती दिली आणि म्हटले की, ‘त्यांची टीम पीडितांच्या मित्रांशी संपर्कात आहेत.’

भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘कॅनडामध्ये एक दुःखद घटना घडली आहे. शनिवारी टोरंटो जवळ एका रस्ते अपघातामध्ये ५ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. इतर दोन रुग्णालयात आहेत. पीडितांच्या कुटुंबियांप्रति संवदेना व्यक्त करतो. भारतीय टोरंटो टीम मदतीसाठी पीडितांच्या मित्रांच्या संपर्कात आहेत.’

- Advertisement -

क्विंटे वेस्ट ओंटारियो प्रांतीय पोलिसांनुसार (ओपीपी), मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची ओळख हरप्रीत सिंह, जसपिंदर सिंह, करनपाल सिंह, मोहित चौहान आणि पवन कुमार अशी आहे. दरम्यान हा अपघात कसा आणि का झाला? याचा तपास सुरू आहे.

- Advertisement -

स्थानिक माध्यमानुसार, रविवारी पहाटे ३.४५ वाजता हा अपघात हायवे-४०१वर झाला. या अपघातातील गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – पंढरपूर आणि शेगावच्या भाविकांवर काळाचा घाला; ९ जणांचा मृत्यू, १३ जण जखमी


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -