Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Canada : खलिस्तान समर्थकांकडून पुन्हा हिंदू मंदिराची विटंबना; भिंतीवर मोदी अन् पंजाबबद्दल...

Canada : खलिस्तान समर्थकांकडून पुन्हा हिंदू मंदिराची विटंबना; भिंतीवर मोदी अन् पंजाबबद्दल लिहिला संदेश

Subscribe

Canada : शिख फॉर जस्टिस (SFJ) म्हणजेच खलिस्तान समर्थकांकडून हिंदू मंदिराची विटंबना (Desecration of Hindu temple by Khalistan supporters) करण्याचे सत्र सुरूच आहे. कॅनडातील (Canada) भारतीय दूतावास बंद करण्याची धमकी देण्याच्या एक दिवस आधी ब्रिटिश कोलंबियाच्या सरे शहरातील आणखी एका हिंदू मंदिराची खलिस्तानी समर्थकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. याशिव्या मंदिराच्या बाहेरील भिंतीवर मोदींविरुद्ध आणि पंजाबविरुद्ध संदेश लिहत विटंबना करण्यात आली आहे. गुरुवारी (7 सप्टेंबर) पहाटे ही घटना समोर आली आहे. या घटनेची नोंद रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीस आणि आरसीएमपीमध्ये करण्यात आली आहे. सोशल मीडियावर यासंबंधीची छायाचित्र आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Canada Hindu temple vandalized again by Khalistan supporters A message written on the wall about Modi and Punjab)

हेही वाचा – अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन कोरोनामुक्त; चार दिवसांपासून होत्या कोरोनाग्रस्त

- Advertisement -

गेल्या मे महिन्यापासून ब्रिटीश कोलंबिया आणि ग्रेटर टोरंटो परीसरातील हिंदू मंदिरांना खलिस्तानी समर्थकांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तांनी जागतिक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर कॅनडाला त्यांच्या परिसरातील संभाव्य धोक्याबद्दल सावध केल्यानंतर ब्रिटिश कोलंबियाच्या सरे शहरातील श्री माता भामेश्वरी दुर्गा मंदिराची विटंबना करण्यात आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या ट्वीटमध्ये मंदिराच्या भिंतींवर ‘मोदी आंतकवादी’ आणि ‘पंजाब हा भारत नाही’ अशी भारताविरोधी संदेश रेखाटण्यात आले आहेत. कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामधील सरे येथील हिंदू मंदिराला लक्ष्य करण्याची ही दुसरी घटना आहे.

- Advertisement -

खलिस्तान समर्थक घटकांनी शुक्रवारी व्हँकुव्हर वाणिज्य दूतावास बंद करण्याचे आवाहन केले होते. तसेच कॅनेडातील एका शाळेत 10 सप्टेंबर रोजी तथाकथित खलिस्तान सार्वमत कार्यक्रम रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदू मंदिरावर हल्ला झाल्याची शक्यात वर्तविण्यात येत आहे. परंतु शाळेच्या मंडळाने म्हटले की, शाळा समुदाय कार्यासाठी भाड्याने देण्यात येते. मात्र त्यांच्याकडून शाळेच्या भाडे कराराचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यासोबतचा करार रद्द करण्यात आला आहे. कारण त्यांनी जाहिरातींमध्ये शाळेच्या छायाचित्रांसह AK-47 रायफल आणि सेबर दाखवण्यात आल्याचा आरोप शाळेच्या मंडळाने केला आहे.

हेही वाचा – UIDAI ‘या’ वर्षाच्या शेवटपर्यंत विनामूल्य आधारकार्ड करा अपडेट

दरम्यान, सरे जिल्ह्यातील शाळा मंडळाच्या प्रवक्त्याने प्रसिद्धीपत्राकात म्हटले की, शाळेच्या भाडे कराराच्या उल्लंघनामुळे शाळेसोबतचा भाडे करार रद्द करण्यात आला आहे. या समस्येचे निराकरण करण्याचा आमच्याकडून वारंवार प्रयत्न करण्यात आला, मात्र इव्हेंट आयोजक विवादास्पद प्रतिमा काढण्यात अयशस्वी ठरले. याशिवाय त्यांनी जाहिरात सरेमध्ये आणि सोशल मीडियावर पोस्ट करणे सुरूच ठेवल्यामुळे करार रद्द करण्यात आला आहे. याशिवाय शाळेचा हा निर्णय शिख फॉर जस्टिस (SFJ) च्या कार्यक्रम आयोजकांना कळविण्यात आला होता. मात्र त्यानंतर फुटीरतावादी गटाने सार्वमतासाठी कोणतीही पर्यायी तारीख जाहीर केलेली नाही, असेही प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -