घरदेश-विदेशCanada-India Crisis: कॅनडाचे एक पाऊल मागे; भारतविरोधी पोस्टर, बॅनर हटविण्याचे आदेश

Canada-India Crisis: कॅनडाचे एक पाऊल मागे; भारतविरोधी पोस्टर, बॅनर हटविण्याचे आदेश

Subscribe

स्थानिक अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर कॅनडातील सरे येथील गुरुद्वारातून भारतीय मुत्सद्दींच्या हत्येचे आवाहन करणारे पोस्टर्स हटवण्यात आले होते.

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरानंतर कॅनडाची भूमिका काहीशी आता मवाळ होताना दिसत आहे. ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील महत्त्वाच्या ठिकाणी खलिस्तानच्या समर्थनार्थ लावलेले होर्डिंग आणि बॅनर हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खलिस्तानी समर्थकांनी त्यांचा प्रचार पुढे नेत ठिकठिकाणी होर्डिंग्ज आणि बॅनर लावले होते, जेणेकरून लोकांना ते पाहता यावे आणि प्रभावित व्हावे. मात्र आता ते काढले जात आहेत. (Canada India Crisis Canadas Step Back Order to remove anti India posters banners)

स्थानिक अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर कॅनडातील सरे येथील गुरुद्वारातून भारतीय मुत्सद्दींच्या हत्येचे आवाहन करणारे पोस्टर्स हटवण्यात आले होते. सरे गुरुद्वाराला तीन भारतीय मुत्सद्यांच्या हत्येचे आवाहन करणारे पोस्टर्स काढून टाकण्यास सांगण्यात आले होते, त्यानंतर अधिकाऱ्यांना या प्रकरणाची तीव्रता आणि कॅनडाविरोधातही असेच कृत्य पुढे येण्याची शक्यता लक्षात येताच त्यांनी हे पाऊल उचलले आहे. तसेच गुरुद्वारा व्यवस्थापनाला कोणत्याही मूलगामी घोषणेसाठी लाऊडस्पीकरचा वापर न करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : संयुक्त राष्ट्राकडून भारताचे कौतुक; ‘या’ कारणामुळे होत आहे शुभेच्छांचा वर्षाव

संघटनानाही दिली ताकीद

ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील प्रमुख क्षेत्र सरे, गिल्डफोर्ड, न्यूटन आणि व्हेली येथून भारतविरोधी आक्षेपार्ह पोस्टर्स, बॅनर काढले जात आहेत. याशिवाय कॅनडा-अमेरिकेच्या सीमावर्ती भागातील खलिस्तान समर्थक संघटनांना त्यांचे आक्षेपार्ह साहित्य हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर केलेल्या बेताल आरोपानंतर दोन्ही देशांमधील संबंध चांगलेच बिघडले आहेत. भारताने कॅनडाचे व्हिसा अर्ज तात्पुरते निलंबित केले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : ‘महात्मां’च्या जयंतीला मोदी सरकार देणार ‘स्वच्छांजली’; देशभर एक तास राबवली जाणार स्वच्छता मोहीम

भारताने कॅनडा नागरिकांच्या व्हिसावर बं

दोन्ही देशांमधील तणाव इतका वाढला की, भारताने 21 सप्टेंबर रोजी कॅनडाच्या नागरिकांच्या व्हिसावर बंदी घातली. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, अलीकडच्या काळात कॅनडात भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणाऱ्या भारतीय मुत्सद्दी आणि भारतीयांना लक्ष्य करण्यात आले आहे. भारताने कॅनडामध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी एक अॅडव्हायजरी जारी केली असून अशा घटना दिसलेल्या भागात जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरून कॅनडावर दबाव

संयुक्त राष्ट्र महासभेच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र जपानने यावर सहमती दर्शवलेली नाही. हा कॅनडासाठी मोठा धक्का मानला जात आहे. अमेरिकेने कॅनडाची बाजू घेतली असली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर कॅनडावर दबाव असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच कॅनडाने नरमाईची भूमिका घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -