नवी दिल्ली : भारत आणि कॅनडा या दोन्ही देशातील संबंध आणखीन ताणले जात आहेत. यादरम्यान आज विदेश मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन कॅनडावर थेट हल्ला केला आहे. दहशतवादी, अतिरेकी आणि संघटित गुन्हेगारीसाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून कॅनडाची ओळख वाढत असून, त्याला पाकिस्तान मदत करत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. (Canada is becoming a hotspot for terrorists with the help of Pakistan A direct attack from the Ministry of External Affairs)
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, हरदीप सिंह निज्जर यांच्या मृत्यूनंतर कॅनडाकडून अद्याप कोणतीही ठोस माहिती दिल्या गेलेली नाही. तर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने कॅनडाच्या सरकारच्या आरोपांना उत्तर देताना काही प्रमाणात पक्षपातीपणा असल्याचे म्हटले आहे. हे आरोप प्रामुख्याने राजकीय हेतूने प्रेरित अशीही यावेळी पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे.
#WATCH | MEA Spokesperson Arindam Bagchi says, “Yes, we’ve informed the Govt of Canada that there should be parity in strength in our mutual diplomatic presence. Their number is very much higher than ours in Canada… I assume there will be a reduction from the Canadian side.” pic.twitter.com/4LIBeyhzBz
— ANI (@ANI) September 21, 2023
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यानेही कॅनडातील व्हिसा सेवांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. ते म्हणाले की, आमचे उच्चायुक्तालय आणि कॅनडामधील दूतावासांना भेडसावणाऱ्या सुरक्षा धोक्यांची जाणीव आहे. त्यामुळे त्यांचे सामान्य कामकाज विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत आमचे उच्चायुक्त आणि वाणिज्य दूतावास व्हिसा सेवांवर काम करण्यास तात्पुरते अक्षम आहेत. आम्ही नियमितपणे परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा : इतर राज्यांतील आरक्षणाच्या निर्णयाची कार्यपद्धती तपासली जाणार- मुख्यमंत्री शिंदे
कॅनडाने आंतरराष्ट्रीय प्रतिमेबाबत चिंता करावी
परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडावर दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप केला. अरिंदम बागची म्हणाले की, कॅनडा दहशतवादी कारवायांचे केंद्र बनत असून दहशतवादी आणि अतिरेक्यांचे आश्रयस्थान बनले आहे. मला वाटते की, कॅनडाला त्याच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेची काळजी करण्याची गरज आहे.
हेही वाचा : Sukkha Dunake Murder : लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली हत्येची जबाबदारी; फेसबुक पोस्टमध्ये दिली धमकी
विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा
कॅनडात राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांबाबत परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. आमचे वाणिज्य दूतावास तेथे कार्यरत आहे. त्यांना काही समस्या आल्यास त्यांनी आमच्या वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधावा, असे आम्ही म्हटले आहे. आमच्या व्हिसा धोरणामुळे त्यांना काही फरक पडू नये, कारण ते भारताचे नागरिक आहेत अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.