Homeदेश-विदेशJustin Trudeau resigned : अखेर जस्टिन ट्रूडो यांचा राजीनामा; पक्षाचे अध्यक्षपद देखील...

Justin Trudeau resigned : अखेर जस्टिन ट्रूडो यांचा राजीनामा; पक्षाचे अध्यक्षपद देखील सोडले

Subscribe

ओटावा : भारतविरोधी धोरणे राबवल्याने सातत्याने वादात सापडलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी अखेर 6 जानेवारी 2025 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यासोबतच त्यांनी आपल्या लिबरल पक्षाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. (canada prime minister justin trudeau resigned says i intend to resign pm and liberal party leader)

कॅनडातील वृत्तपत्र ग्लोब अँड मेलने दिलेल्या वृत्तानुसार, जस्टिन ट्रुडो यांनी सांगितले की, नवीन पंतप्रधान नियुक्त होईपर्यंत तेच या पदाचा कार्यभार सांभाळतील.

पक्षाचा नेता तसेच पंतप्रधान म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. पक्षाकडून नवीन नेत्याची निवड होईपर्यंत मी या पदावर कार्यरत राहीन. नवीन अध्यक्षांची निवड करण्यासंबंधी मी पक्षाच्या अध्यक्षांना माहिती दिली आहे.

हेही वाचा – Boundary Dispute : मृतदेह देखील जेव्हा हद्दीच्या वादात सापडतो…वाचा काय आहे प्रकरण

जस्टिन ट्रुडो यांनी राजधानी ओटावा येथे पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याची घोषणा केली. पुढील निवडणुकीत या देशाला पात्र नेता मिळेल. मला जर पक्षांतर्गतच लढाई लढावी लागणार असेल, तर मी सर्वोत्तम निवड असूच शकत नाही. नवीन पंतप्रधान आणि लिबरल पक्षाचे इतर नेते पक्षाची मूल्ये तसेच आदर्श पुढे घेऊन जातील, असा विश्वास जस्टिन ट्रूडो यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात व्यक्त केला.

11 वर्षांपासून जस्टिन ट्रुडो लिबरल पक्षाचे नेते तर 9 वर्षांपासून पंतप्रधान आहेत. मात्र, काही काळापासून त्यांना जगभरातून तसेच स्वतःच्या देशातूनही टीकेचा सामना करावा लागला आहे. खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर ट्रुडोंनी भारतावर आरोप केले होते. त्यामुळे कॅनडा आणि भारताचे संबंध बिघडले आहेत. आता ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर कॅनडाचा नवीन पंतप्रधान कोण होणार, हे पाहणे महत्वाचे आहे.

तेथील स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, पुढील पंतप्रधान कोण होणार, यावर पंतप्रधानांचे सल्लागार चर्चा करत आहेत. ट्रूडोंच्या राजीनाम्यानंतर पक्षाकडे दोन पर्याय आहेत. एक म्हणजे, त्यांनी सर्वानुमते अंतरिम नेत्याची निवड करावी. अन्यथा नेत्याच्या निवडीसाठी पक्षांतर्गत निवडणुका घ्याव्यात.

द ग्लोबने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रूडोंनी अर्थमंत्री डॉमिनिक लेब्लँक यांच्याशी चर्चा केली असून, त्यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. याशिवाय, बँक ऑफ कॅनडा आणि बँक ऑफ इंग्लंडचे माजी गव्हर्नर मार्क कार्नी, यांचेही नाव चर्चेत आहे. याशिवाय, कॅनडाचे माजी अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान क्रिस्टिया फ्रीलँड यांचेही नाव चर्चेत आहे.

हेही वाचा – Bangladesh : शेख हसीना यांना युनूस सरकारचा आणखी एक दणका; वाचा सविस्तर