घरताज्या घडामोडीEmergency In Canada: कोरोना निर्बंधांच्या विरोधातील आंदोलांमुळे कॅनडाच्या पंतप्रधानांचा मोठा निर्णय; आणीबाणी...

Emergency In Canada: कोरोना निर्बंधांच्या विरोधातील आंदोलांमुळे कॅनडाच्या पंतप्रधानांचा मोठा निर्णय; आणीबाणी केली घोषित

Subscribe

कॅनडाच्या पंतप्रधानांनी ५० वर्षात पहिल्यांदाच व्यापक सरकारविरोधी आंदोलने रोखण्यासाठी आणीबाणी कायदा लागू केला.

कॅनडामध्ये कोरोना निर्बंधांविरोधात मोठा प्रमाणात आंदोलन सुरू आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून ट्रक चालक आणि इतर शेकडो वाहने घेऊन आंदोलकर्त्यांनी देशाची राजधानी ओटावाचे रस्ते बंद केले आहेत. कॅनडामधील कोरोना निर्बंध संपवा अशी मागणी आंदोलनकर्ते करत आहे. या अनुषंगाने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Canada Prime Minister Justin Trudeau) यांनी आणीबाणीची (Emergency) घोषणा केली आहे. एएनआय वृत्तसंस्थेच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कोरोना निर्बंधांचा विरोध थांबवण्यासाठी आणीबाणी कायदा लागू केली आहे. (Canada Prime Minister Justin Trudeau invokes Canada emergencies act to end Covid rule protests)

- Advertisement -

५० वर्षात पहिल्यांदा कॅनडाच्या सरकारवर आणीबाणी घोषित करण्याची वेळ आली आहे. कॅनडामध्ये ट्रक चालकांचे देशव्यापी तीव्र आंदोलन पाहता पंतप्रधान जस्टिन ट्रूडो सोमवारी म्हणाले की, ‘ट्रक चालक आणि इतर लोकांचे तीव्र विरोध पाहता आणीबाणी लागू केली जात आहे. आंदोलनकर्ते ओटावामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहे. देशातील कोरोना संदर्भात लावल्या गेलेल्या निर्बंधांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे. दरम्यान पंतप्रधानांनी या परिस्थिती संदर्भात बोलण्यासाठी कॅनडातील प्रांतांमधील नेत्यांसोबत बैठक केली. त्यानंतर देशाला संबोधित करण्याची योजना केली

पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले की, टही परिस्थिती संपवण्यासाठी आणीबाणी लागू केली जात आहे. सध्या कठीण परिस्थिती आहे. अशा परिस्थिती आंदोलने केली जात आहे. याचा परिणाम आमच्या अर्थव्यवस्थेसोबत जनतेच्या सुरक्षितेवर होत आहे. अशात आम्ही आणखीन धोकादायक आंदोलने वाढू देऊ शकत नाही.’

- Advertisement -

माहितीनुसार, कॅनडा सरकारने कोरोना लसीकरण बंधनकारक केले होते. या मुद्द्यावरून कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. लोकं रस्त्यावर उतरले असून कॅनडा सरकारचा विरोध करत आहेत.


हेही वाचा – Ukraine Crisis India: काश्मीर, S-400… रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यास भारताचं टेन्शन वाढणार, समजून घ्या…


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -